Sunday 12 July 2020

सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !


बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर्टिकल लिहायचं आहेच.  मी माझं यु ट्यूब चॅनेल सुरु करत आहे त्यामुळे जरा थोडस वेगवेगळे व्हिडीओ बघणं,कन्टेन्ट वर काम,त्यात कधीही कॅमेरा फेस नाही केला आहे त्यामुळे त्याची प्रॅक्टिस असं सगळं सुरु असल्याने दैनंदिन सगळी काम जरा बाजूलाच पडली,रोज ह्या मंचावर येणं हे खर तर माझ्या दैनंदिन कामाचा च भाग आहे पण...... जरा गॅप पडली. असो.

मी ब्लॉगर आहे आणि सोशल मीडिया वर खूप ऍक्टिव्ह असते,आणि qyora तर माझा सगळ्यात फेव्हरेट प्लॅटफॉर्म आहे कारण इथे लोक माहिती, ज्ञान मिळवण्यासाठी येतात. माझा नोकरीचा अनुभव हा जाहिरात एजन्सी शी  रिलेटेड आहे आणि सोशल मीडिया वर एक्टीव्ह असल्याने खूप लोक मला आमच्या प्रॉडकट प्रोमोशन करून द्याल का असं विचारात असतात.

त्याच संदर्भात  जे अनुभव येतात त्या बद्दल लिहावं असं मनात आलं.

 

लोक जेव्हा प्रोमोशन बद्दल विचारतात तेव्हा त्यांना असं वाटत असत कि डिजिटल प्रोमोशन करणारी व्यक्ती अथवा एजन्सी ला पैसे दिले आणि काम दिल म्हणजे लगेच आपल्या बिझनेस मध्ये खूप मोठी वाढ होणं अपेक्षित आहे कारण ह्या लोकं कडे खूप डेटा असतो आणि आजकाल डेटा ला खूपच किंमत आहे.

 

असं वाटणाऱ्या तमाम लोकांना मला सांगावस वाटत कि कोणत्याही व्यक्तीला,एजन्सीला तुम्ही काम दिल्याने असं होणार नाही आणि जर तस काही तुम्हाला मार्केट मधून मिळत असेल तर ती ग्रोथ ऑरगॅनिक नाही हे सोशल मीडिया चॅनेल्स ना लगेच समजत. आणि डेटा जरी उपलब्ध असला तरी त्यातील किती डेटा हा तुमचा सिरीयस बायर असेल ह्या बद्दल कुणीच काही सांगून नाही शकत. माझा अनुभव हे सांगतो कि सोशल मीडिया प्रोमोशन करून होणार बिझनेस कन्व्हर्जन रेशो हा तसा खूपच कमी असतो. (ह्या क्षेत्रातील लोक अधिक चांगलं सांगतील,मी खूप तज्ञ् नाही ह्यातील,फक्त हे मी माझ्या अनुभवावरून स्टेटमेंट देत आहे.) सोशल मीडियाचा खरा उपयोग तुमच्या ब्रॅण्डिंग साठी जास्त चांगला होतो. आणि तुमचं प्रोडक्ट ब्रँड बनायला तुम्ही सातत्य ,तुमची गुणवत्ता आणि तुमची सर्व्हिस ह्या तीन पिलर्स वर काम कारण जास्त महत्वाचं ठरत.

मला जेव्हा ह्या बद्दल सल्ला विचारलं जातो तेव्हा मी नेहमी समोरच्या व्यक्तीला हे सांगते कि सोशल मीडिया तुमचा ब्रँड अवेअरनेस साठी खूप उपयुक्त आहे पण तुम्ही थोडा धीर धरून सातत्य राखण हि खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया हे टी २० मॅच नाही ते कसोटी क्रिकेट आहे.

 

खूपदा लोक असं हि ऑफर देतात कि तुम्हाला काम दिल्यावर जो बिझनेस जनरेट होईल त्यातलं एवढे % कमिशन तुमचं ! 

अशी ऑफर देणाऱ्या लोकांना माझं सजेशन हे असत कि मग तुम्ही मार्केटिंग ला स्टाफ ठेवा ,पण लोक मार्केटिंगच्या स्टाफ ला जास्त पगार आणि इन्सेन्टिव्ह देण्यापेक्षा हे बरं असा  विचार करतात.

फक्त सोशल मीडिया वरून प्रोमोशन करून संपूर्ण बिझनेस जनरेट होत असतो का ? माझ्या मते ह्याच  उत्तर नाही असं आहे कारण सोशल मीडिया हे एक टूल आहे. 

 

तुमचा बिझनेस वाढायला तुमचं प्रोडक्टची  क्वालिटी ,तुमची पोस्ट डिलिव्हरी सर्व्हिस ,तुमची बॅकऑफिस सिस्टीम ,तुमच्या प्रोडक्ट ची किंमत आणि क्वालिटी चा ताळमेळ ,तुमचे कॉम्पिटिटर चे प्रोडक्ट्स त्यांची सर्विसेस ,सगळ्यात महत्वाचा घटक तुमचा स्टाफ ,तो किती जीव ओतून काम करतो. (म्हणजे त्याला तुमची कंपनी किती आपली वाटते) कारण नुसतं पगार मिळतो म्हणून काम करणारे लोकांना तुमच्या कस्टमर ला काय वाटत ,त्यांना द्यायची सर्व्हिस महत्वाची नाही वाटत.

मग सोशल मीडिया महत्वाचं नाही आहे का ?वापरायचं कशाला उपयोग नसेल तर असं काहींना वाटू शकत !

 

सोशल मीडिया मुळे तुमचा ब्रँड एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहचतो. तुम्हाला तुमचे कॉम्पिटीटर्स काय स्ट्रॅटजी वापरत आहेत,त्यांचे कस्टमर बद्दल काय बोलतात हे समजत . तुमच्या कस्टमर ना हि तुमच्या बद्दल काय वाटत हा रिव्यू तुम्हाला मिळतो आणि तो तुमची सर्व्हिस ,तुमची उत्पादन गुणवत्ता साठी खूप महत्वाचा असतो. तुम्हाला ब्रँड अवेअरनेस मध्ये सोशल मीडिया मुळे भौगोलिक सीमा राहत नाहीत,ब्रँड अवेअरनेस मुळे तुमच्या बिझनेस मध्ये नक्कीच वाढ होते!

तुम्ही योग्य seo स्ट्रॅटजी वापरलीत तर तुमची वेबसाईट रँक व्हायला मदत होते.

 

त्यामुळे सोशल मीडिया जरूर वापरावं बिझनेस प्रोमोशन साठी पण सर्वस्वी त्यावरून तुमचा बिझनेस जनरेट होईल अशी अपेक्षा ठेवू नये अशी विनंती !

 

 


Friday 26 June 2020

वर्क फ्रॉम होम करताना ...

वर्क फ्रॉम होम करताना ...

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना मुळे आपण घरी आहोत आणि वर्क फ्रॉम होम अनेक जणांचं सुरु झालं. आधी खूपच गोंधळलेली परिस्थिती होती आणि नक्की किती दिवस असेल हे सगळं . अतिशय आपण सगळेच गोंधळलेले होतो. हळू हळू ह्या परिस्थिती ला आपण सरावलो आणि रुटीन बसायला लागलं.

वर्क फॉर्म होम सुरुवातीला अगदी खूप छान छान वाटलेलं ,कि टाइम फ्लेक्सिबिलिटी आपल्याला मिळणार,ट्रॅव्हलिंग नाही ,ज्यांच्या घरी लहान मूल  आहेत त्यांना मुलांची चिंता नाही पण नंतर नंतर ह्यातले ड्रॉबॅक्स जाणवायला लागले. वर्क फ्लेक्सिबिलिटी ने तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य कधी हिरावून घेतलं हे समजलं नाही !

म्हणजे असं झालं कि बाबा  असून हि बाबा कडे आपल्य्साठी वेळ नाही आणि बायको ची पण हीच मागणी आणि बायकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर किमान पुरुषांना सलग वेळ तरी मिळतो ऑफिसच्या काम करिता ,बायकाना तर तो सुद्धा नाही. सगळे घरात ,त्यात बाई नाही कामाला त्यामुळे घर कामाचा लोड,वेगवेगळ्या डिशेश रोजची फर्माईश आणि ऑफिस काम,मुलांचा  अभ्यास,खऱ्या अर्थाने बायका सुपर वुमन झाल्या ह्या काळात !

ह्या wfh  culture  बायकांना ऑफिस मध्ये जो सलग वेळ मिळत होता तो घरातून काम करताना अजिबात मिळत नाही. घरातल्या कामासाठी गृहीत धरलं जात. खूप घरांमध्ये "अग हे एवढं झालं कि कर ना तुझं काम" असं करत घराची काम  प्रायोरिटी वर आणि ऑफिसच्या कामाचं काय? तिथल्या बॉस  प्रेशर डेडलाईन प्रेशर ह्या बद्दल फार कमी वेळा समजून घेतलं गेलं आहे.

एकाजागी  तास तास बसणं नक्कीच चांगलं नाही आरोग्यासाठी  पण म्हणून ब्रेक मध्ये घरातील काम असं बऱ्याच जणींचा रुटीन झालं. "मी टाइम" मिळायलाच बंद झाला,मैत्रिणी,महिन्यातून एकदा लंच ला भेटणं सगळं सगळं पुन्हा सुरु व्हायला किती दिवस लागतील काय माहित ?

 

मला असं वाटत कि प्रत्येकीने घरातील सर्व मेम्बर्स शी बोलून ह्या wfh culture शी मॅच होणार रुटीन बसवावं म्हणजे नात्यात ताण निर्माण होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तिचा हक्काचा "me time" मिळणं कौटुंबिक आरोग्यासाठी गरजेचा आहे. असं मला वाटत.

घरातल्या सर्वानी सर्व काम वाटून घेतली,अगदी मुलांनाही सहभागी करून घेतलं त्यामध्ये तर ते पण शिकतील एन्जॉय करतील,घरातल्या स्त्री वर येणारा कामाचा ताण कमी होईल तिला तीच करिअर नीट सांभाळता येईल.शेवटी घरातील स्त्री कुटुंबासाठीच साठी नोकरी किव्हा व्यवसाय करत असते नाही का ?



Saturday 30 May 2020

वर्क फ्रॉम होम सुरु आहे ,पोमोडोरो टेक्निक वापरा आणि दिवसभर फ्रेश राहा !


सध्या आपण सगळे लॉक डाऊन मुळे घरी आहोत आणि बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे ,आणि काही कंपन्यांनी तर आता दीर्घ काळासाठी   आता वर्क फ्रॉम होम सांगितलं आहे. वर्क फ्रॉम होम करत असताना तास तास लॅपटॉप वर काम करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण उठायचा कंटाळा करतो,कामाची लिंक तुटते असं आपल्यला वाटत किव्हा हे एवढं कंप्लिट करू आणि मग थोडा मोठा म्हणजे १५ मिनिट  चा ब्रेक घेऊ असं काहीस वाटत किव्हा काहींना नंतर मूड राहणार नाही  त्या पेक्षा कंप्लिट करा आहे ते असं वाटत. पण ह्या मध्ये आपण आपल्या वरचा कामाचा ताण वाढवून घेत असतो. सलग काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो.

मी काही दिवसांपूर्वी "पोमोडोरो" नावाचं टाइम मॅनेजमेंट टेक्निक बद्दल वाचलं,मी ते वापरायला सुरुवात केली ,मला छान वाटलं,इझी वाटलं आणि मेनली मला माझी प्रॉडक्त्विटी  थोडी वाढल्यासारखी वाटली. कारण माझं अलीकडे  माझ्या कामाचं शेड्युल सगळं थोडस डिस्टरब झाल्या सारखं मला वाटत होत ,म्हणजे मी रोजचे डेली टास्क आदल्या दिवशी झोपायच्या आधी लिहिलेले असतात,कामाला सुरुवात हि वेळेत करत होते ,पण एक काम सुरु केलं कि त्यात अजून अजून गुंतणं होत होत,सो त्याच्या पुढच्या नियोजित कामाला उशीर असं सगळं दिवसभर व्हायचं आणि मग एन्ड ऑफ  द डे  मला टेन्शन यायचं कि ठरवलेल्यातील ३० % काम राहून गेली आहेत मग उद्या च गणित चुकायला नको म्ह्णून ती वीकली ऑफ च्या दिवशी मॅनेज करा म्हणजे विकली ऑफ ला स्वतःसाठी काढलेला वेळ ह्या कामाला द्यायचा म्हणजे एक प्रकारे स्वतःची प्रगती थांबवण्यासारखं च आहे नाही का !

आणि जेव्हा पासून मी "पोमोडोरो" टेक्निक वापरायला लागले तस कामात सुटसुटीत पण आला माझा मला स्वतःवर ट्रॅक ठेवता येऊ लागला कि एखाद काम किती वेळ करायचं आहे, आणि किती वेळात संपवायचं आहे. फिलिंग ग्रेट !

बरं आता पाहू काय आहे हे "पोमोडोरो  टेक्निक?"

 ८० च्या  दशकामध्ये Francesco Cirillo  ह्यांनी ह्या टेक्निक चा शोध लावला होता. ह्या मध्ये आपल्या वेळाचे  २५ मिनिटाचे स्लॉट तयार करायचे असतात आणि २५ मिनिटं नंतर तुम्ही मिनिट चा ब्रेक घ्यायचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं ह्या ब्रेक मध्ये तुम्ही जागे वरून कंपलसरी उठायचं असत आणि परत २५ मिनिटं  काम आणि मिनटं  ब्रेक असे आपले सायकल झाले कि  म्हणजे तुमचं १०० मिनिट काम झालं कि १५ मिनिटं ब्रेक असं संपूर्ण दिवस भर करायचं असत.

ह्या टेक्निक मुळे  होणारे फायदे :-

ह्या मुळे कामातलं कॉन्सन्ट्रेशन वाढत. अगदी मोबाईल समोर असला,एखादा फोन आला तरी तुम्ही तो लगेच अटेंड न करता ५ मिनिटाच्या ब्रेक मध्ये करू शकता.

माईंड फ्रेश राहत.

न थकता तुम्ही अधिक काळा पर्यंत काम करू शकता.

काम टाळणं किव्हा पोस्टपोन करण्याचे प्रमाण कमी होते.

कार्यक्षमता वाढते.

टार्गेट पूर्ण करण्याची शक्यता वाढीस लागते. 

 

आणि ह्या सोबत एका वेळी एकच काम करण्याची सवय लागते कारण आजकाल आपण एकीकडे व्हाट्स अप ,फेसबुक,इंस्टग्राम  पाहत  काम  करत असतो.

ठराविक वेळानंतर ब्रेक घेत असल्याने तुम्ही त्या वेळेत पाणी पिऊन डिहायड्रेशन हि टाळू शकता.

मला ह्या टेक्निक चा खरंच खूपच फायदा होत आहे,तुम्ही हि वापरून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा.


सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...