Saturday 30 May 2020

वर्क फ्रॉम होम सुरु आहे ,पोमोडोरो टेक्निक वापरा आणि दिवसभर फ्रेश राहा !


सध्या आपण सगळे लॉक डाऊन मुळे घरी आहोत आणि बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे ,आणि काही कंपन्यांनी तर आता दीर्घ काळासाठी   आता वर्क फ्रॉम होम सांगितलं आहे. वर्क फ्रॉम होम करत असताना तास तास लॅपटॉप वर काम करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण उठायचा कंटाळा करतो,कामाची लिंक तुटते असं आपल्यला वाटत किव्हा हे एवढं कंप्लिट करू आणि मग थोडा मोठा म्हणजे १५ मिनिट  चा ब्रेक घेऊ असं काहीस वाटत किव्हा काहींना नंतर मूड राहणार नाही  त्या पेक्षा कंप्लिट करा आहे ते असं वाटत. पण ह्या मध्ये आपण आपल्या वरचा कामाचा ताण वाढवून घेत असतो. सलग काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो.

मी काही दिवसांपूर्वी "पोमोडोरो" नावाचं टाइम मॅनेजमेंट टेक्निक बद्दल वाचलं,मी ते वापरायला सुरुवात केली ,मला छान वाटलं,इझी वाटलं आणि मेनली मला माझी प्रॉडक्त्विटी  थोडी वाढल्यासारखी वाटली. कारण माझं अलीकडे  माझ्या कामाचं शेड्युल सगळं थोडस डिस्टरब झाल्या सारखं मला वाटत होत ,म्हणजे मी रोजचे डेली टास्क आदल्या दिवशी झोपायच्या आधी लिहिलेले असतात,कामाला सुरुवात हि वेळेत करत होते ,पण एक काम सुरु केलं कि त्यात अजून अजून गुंतणं होत होत,सो त्याच्या पुढच्या नियोजित कामाला उशीर असं सगळं दिवसभर व्हायचं आणि मग एन्ड ऑफ  द डे  मला टेन्शन यायचं कि ठरवलेल्यातील ३० % काम राहून गेली आहेत मग उद्या च गणित चुकायला नको म्ह्णून ती वीकली ऑफ च्या दिवशी मॅनेज करा म्हणजे विकली ऑफ ला स्वतःसाठी काढलेला वेळ ह्या कामाला द्यायचा म्हणजे एक प्रकारे स्वतःची प्रगती थांबवण्यासारखं च आहे नाही का !

आणि जेव्हा पासून मी "पोमोडोरो" टेक्निक वापरायला लागले तस कामात सुटसुटीत पण आला माझा मला स्वतःवर ट्रॅक ठेवता येऊ लागला कि एखाद काम किती वेळ करायचं आहे, आणि किती वेळात संपवायचं आहे. फिलिंग ग्रेट !

बरं आता पाहू काय आहे हे "पोमोडोरो  टेक्निक?"

 ८० च्या  दशकामध्ये Francesco Cirillo  ह्यांनी ह्या टेक्निक चा शोध लावला होता. ह्या मध्ये आपल्या वेळाचे  २५ मिनिटाचे स्लॉट तयार करायचे असतात आणि २५ मिनिटं नंतर तुम्ही मिनिट चा ब्रेक घ्यायचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं ह्या ब्रेक मध्ये तुम्ही जागे वरून कंपलसरी उठायचं असत आणि परत २५ मिनिटं  काम आणि मिनटं  ब्रेक असे आपले सायकल झाले कि  म्हणजे तुमचं १०० मिनिट काम झालं कि १५ मिनिटं ब्रेक असं संपूर्ण दिवस भर करायचं असत.

ह्या टेक्निक मुळे  होणारे फायदे :-

ह्या मुळे कामातलं कॉन्सन्ट्रेशन वाढत. अगदी मोबाईल समोर असला,एखादा फोन आला तरी तुम्ही तो लगेच अटेंड न करता ५ मिनिटाच्या ब्रेक मध्ये करू शकता.

माईंड फ्रेश राहत.

न थकता तुम्ही अधिक काळा पर्यंत काम करू शकता.

काम टाळणं किव्हा पोस्टपोन करण्याचे प्रमाण कमी होते.

कार्यक्षमता वाढते.

टार्गेट पूर्ण करण्याची शक्यता वाढीस लागते. 

 

आणि ह्या सोबत एका वेळी एकच काम करण्याची सवय लागते कारण आजकाल आपण एकीकडे व्हाट्स अप ,फेसबुक,इंस्टग्राम  पाहत  काम  करत असतो.

ठराविक वेळानंतर ब्रेक घेत असल्याने तुम्ही त्या वेळेत पाणी पिऊन डिहायड्रेशन हि टाळू शकता.

मला ह्या टेक्निक चा खरंच खूपच फायदा होत आहे,तुम्ही हि वापरून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा.


Tuesday 26 May 2020

इच्छापूर्ती साठी स्वतःला कस तयार करायचं?

मागील लेखामध्ये आपण पाहिलं कि आकर्षणाचा सिद्धांत काय असतो आणि तो कस काम करतो.

आकर्षणाच्या सिद्धांताचे तीन टप्पे आहेत.

मागणी करा . आवश्यक ती कृती करणं हे आपल्या हातात असत आणि

तुमची मागणी पूर्ण होणे

आणि तुमची पूर्ण झालेली मागणी स्वीकारा.

मागणी करा :- तुमच्या मनात एखादी इच्छा तयार होते,ती तुम्ही निसर्गा कडे किव्हा परमेश्वराकडे व्यक्त करता.

परमेश्वर किव्हा निसर्ग तुमची इच्छा पूर्ण करतो.

 आणि तिसरी शेवटची अतिशय महत्वाची पायरी कि  तुम्हाला परमेश्वर देत आहे त्याला  स्वीकारण्याची स्वतःला अनुमती देणं.

जेव्हा तुमची स्पंदन आणि निसर्गाची स्पंदन मॅच होतात ,तेव्हा तुमची इच्छा पूर्ती होते. आणि ह्या साठी जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता तेव्हा पासून तुम्ही स्वतःला यश स्वीकारण्यासाठी तयार करण गरजेचं असत. कारण इच्छा व्यक्त करणं ,त्यासाठी काम करणं म्हणजेच योग्य ती कृती करणं हे आपल्या हातात असतं आणि त्याच फळ देणं हे निसर्गाचं किव्हा परमेश्वराचं काम असत.

खूप वेळा आपणच आपल्या विचारांनी आपल्या इच्छा पूर्तीच्या मार्गात नकळत अडथळे निर्माण करत असतो.

सतत ची काळजी करणं ,नीट होईल ना असा सातत्याने विचार करणं . ह्या मुळे तुमची नकारात्मक भावना ना

खत -पाणी घालता आणि स्वतःच स्वतःच्या मार्गात अडथळे निर्माण करता. आणि ही नकारात्मक भावना निर्माण होते कारण तुमचा स्वतःवर विश्वास नसतो.

तुमचा विश्वास हा तुमच्या पात्रतेविषयीचे समज किव्हा विचार पक्के करत असतो. तुमचा स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तुम्ही रोज सकारात्मक अफिरमेशन वाचली पाहिजेत. रोज तुमची ध्येय लिहून काढा. (आजकाल खूप सारी डायरी ची ऍप उपलब्ध आहेत पण ती वापरू नका,कारण जेव्हा तुम्ही हाताने लिहिता तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती अधिक अटॅच होता.)

व्हिजन बोर्ड तयार करा. व्हिजन बोर्ड अश्या ठिकाणी लावा कि तुम्हाला तो सतत दिसेल आणि त्यावर तुमच्या स्वप्ननाची चित्र लावा. असं म्हणतात कि एक चित्र अनेक शब्दांचं काम करत. का,कसं असे प्रश्नांना मनात येऊ देऊ नका.  ह्या नंतर चा महत्वाचा मुद्दा आहे कृती. तुम्ही जर आवश्यक ती कृती केलीच नाही तर तुम्हाला संधी मिळणार नाही आणि इच्छापूर्ती हि होणार नाही.

कोणतीही गोष्ट मिळवताना भावना,विश्वास ,विचार आणि कृती ह्या चारही गोष्टी लागतात.

तुम्ही कधीही कुणाशी हि जेव्हा संवाद साधता तेव्हा तुम्ही तुमचं बोलणं ऐकता का ? मी असं इथे सुचवू इच्छिते कि हे वाक्य तुम्ही नीट लक्ष्य देऊन वाचा आणि मिनिट थांबून आठवा कि खरंच तुम्ही तुमचं बोलणं ऐकता का ? बरेच लोकांना माहीतच नसत कि ते काय बोलत आहेत (जरा विचित्र वाटेल पण हि वास्तवता आहे )लोक खरंच स्वतःचे शब्द ऐकत नसतात. तुम्ही काय बोलता आहात हे ऐकायला शिकलात कि तुमचं तुम्हालाच समजायला लागत कि आपले विचार चुकीचे आहेत कि बरोबर आहेत ते. आकर्षणाच्या सिद्धांताच्या बाबतीत हि हेच होत ,तुम्ही एखादी इच्छा मनात बाळगून असता आणि त्या बद्दल अगदी कॉन्फिडन्ट असता,व्हिजन बोर्ड ,अफिरमेशन सगळं नीट प्रोसिजर फॉलो करता पण कुणाशी संवाद करताना जर असं म्हणत असाल कि "बघू यार ट्राय तर केलाय,काय माहित काय होईल?नाही झालंच तर मग बघू काय करायचं ते  ! " आता ह्या वाक्यातून तुम्ही युनिव्हर्सल पॉवर वर आणि स्वतःवर शंका व्यक्त केली,काळजी दिसली बरोबर ? म्हणजे मनातले विचार आणि कृती ह्याचा ताळमेळ नाही आहे. आपल्या प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा असते ,तुम्ही जेव्हा नकारात्मक शब्द उच्चारता तेव्हा  नकारात्मक ऊर्जा वातावरणामध्ये  ट्रान्स्मिट करता आणि स्वतःच नवीन अडथळा बनवता !

म्हणजेच तुमचं कायम कम्युनिकेशन हे सकरात्मक हवं म्हणजे तुम्ही सकरात्मक ऊर्जा ट्रान्स्मिट कराल आणि चांगल्या हव्या असणाऱ्या गोष्टी आकर्षित कराल.

तुमच्या दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. अगदी सगळ्या माणसांबरोबरच वस्तूंविषयी हि कृतज्ञता व्यक्त करा.आज तुमच्या कडे जे काही आहे त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि त्याच सोबत जे हवं आहे त्या बद्दल हि कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा. कृतज्ञता आपण कधी व्यक्त करतो ,जेव्हा आपल्याला काही मिळत तेव्हा बरोबर ? तुम्ही जर हे व्हिज्युलाईझ केलं कि जे तुम्हाला हवं आहे ते मिळालं आहे आणि कृतज्ञता व्यक्त केली कि तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही जितके कृतज्ञ राहाल तेवढं तुम्हाला अधिक मिळत जात. आणि जेवढ्या सध्याच्या परिस्थिबद्दल तक्रारी कराल तेवढ्या तक्रारीचा वाढत जातील कारण " " लाईक अट्रॅक्ट्स लाईक !"

योग्य संधी तुमच्या समोर येईल ह्यावर विश्वास ठेवा आणि  स्वतःची तयारी करून ठेवा संधीच सोन करण्यासाठी !

आणि सातत्याने त्याच गोष्टीचा विचार करू नका. कारण सतत त्याच एकाच विचाराचा पाठलाग करून तुम्ही अडथळे निर्माण करत असता. पेशन्स ठेवा. म्हणजे असं कि तुम्ही सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना तुम्ही तुमच्या इच्छा साठी व्हिज्युलायझेशन केलं,कृतज्ञता व्यक्त केली आणि त्या नंतर तुमचा दिवस नॉर्मल असू देत,त्या इच्छा चा दिवसभर विचार करू नका. युनिव्हर्सल पॉवर वर सोडून द्या. हि खूप महत्वाची गोष्ट आहे. आकर्षणाचा सिद्धांत वापरताना खूपदा  लोक इथे चुकतात. आणि नेहमी तुम्ही जेव्हा एखादा गोल सेट करता तेव्हा तो गोल लोकांच्या आयुष्यात काय व्हॅल्यू ऍडिशन करणारा आहे ह्याचा विचार कायम करा,कारण जेव्हा तुम्ही इतरांसाठी भरभरून करता तेव्हा तुम्हाला भरभरून निसर्ग देतो.

मेडिटेशन रोज करा त्यामुळे तुमचा स्वतःशी संवाद वाढेल आणि  परमेश्वराशी हि संवाद वाढेल कारण आपला आत्मा हा परमेश्वरी अंश असतो,आपण त्याचाच एक भाग आहोत.

श्रीमंत व्हा. सुखी व्हा आणि यशस्वी व्हा !


Saturday 23 May 2020

आकर्षणाचा सिद्धांत काय असतो ?


हे संपूर्ण विश्व काही नियमांवर चालत ,ह्यातील काही नियम आपल्याला माहित असतात आणि काही माहित नसतात. पण सृष्टीच्या उत्पत्ती पासून हे नियम अस्तित्वात आहेत आणि त्या प्रमाणेच सर्व काही निसर्गा मध्ये सुरु असतं . ह्यातील एक नियम म्हणजे आकर्षणाचा नियम. काही वर्षांपूर्वी असाच एकदा मी माझ्या एका मित्राशी बोलत होते आणि आमचा विषय बोलता बोलता अजून एका मित्राचं लग्न जमत नाही ह्यावरती गेला आणि तो मित्र मला म्हणाला कि "अग मी त्याला LOA  अप्लाय कर म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत वापर सांगितलेलं पण तरीही त्याच लग्न जमत नाही आहे. "

आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला जे हवं आहे ते मिळवून देतो ,हे लोकांना माहित असत पण मग नक्की चुकत कुठं ,आणि तो वापरताना काही सूचना पाळायच्या असतात का ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले आणि मी वाचन सुरु केलं. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं कि आकर्षणाचा नियम खरं तर नेहमीच म्हणजे अव्याहत काम करत असतो .

आकर्षणाचा नियम हि काही कोणती वस्तू नाही आहे कि हवी तेव्हा वापरली आणि गरज नसेल तेव्हा कपाटात .ठेवून टाकली.

काय असतो बरं हा आकर्षणाचा नियम ?

आकर्षणाचा नियम हा विश्वातील एक शक्तिशाली नियम आहे. आकर्षणाचा नियम एका वाक्यात सांगायचा प्रयत्न करायचा झाला तर सम-समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. आपण  म्हणतो ना "लाईक अट्रॅकटस लाईक !"

आणि हा नियम नकळत तुम्ही अनुभवातही असता बर का ! जस कि एखादा दिवसाची सुरुवात अशी इतकी वाईट होते आणि सगळ्या मनस्ताप घडणाऱ्या घटनांची मालिका त्या दिवशी आपल्या बाबतीत दिवस भर घडते आणि आपण दिवसभर हेच म्हणत राहतो कि "सकाळी सकाळी कुणाचं तोंड पाहिलं आणि दिवस असा गेला!"

खर तर असं कुणाला पाहून दिवस वाईट जात नसतो तर हे  आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्ही जो विचार आकर्षित केलेला असतो त्यामुळे घडलेलं असत. तुम्ही करत असलेले विचार आणि येणारे अनुभव ह्यांची जर तुम्ही सांगड घातलीत तर तुम्हाला नीट समजून येईल. एखादी वाईट घटना सकाळी घडली कि तुमच्या मनात एक विचार सुरु होतो कि दिवस नीट जाईल ना ! हे नको व्हायला,ते नको व्हायला ! आता ह्या मध्ये तुमचा फोकस जे तुम्हाला नको आहे त्यावर आहे त्यामुळे आकर्षणाच्या नियमाप्रमाणे तुम्ही त्याच गोष्टी आकर्षित करता ज्या तुम्हाला नको होत्या.

 

 ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट दोनदा घडते ह्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझी जुनी ब्लॉग पोस्ट वाचू शकता. https://timelesspositive.blogspot.com/  पहिल्यांदा कोणतीही गोष्ट मनात घडत असते आणि नंतर सत्यात घडत असते.आपला प्रत्येक विचाराला एक फ्रिक्वेन्सी असते.  आणि तुमच्या सबकॉन्शस माईंडला फक्त भावना समजतात ,त्याला चूक -बरोबर हे समजत नाही .(हे काम कॉन्शस माईंड असतं आणि आपलं सबकॉन्शस माईंड हे निसर्गाशी किव्हा परमेश्वराशी जोडलेलं असत.)

आता तुम्ही असं समजा कि तुमच्या भावना ह्या जणू काही रेडिओ स्टेशन आहेत. म्हणजे जस तुम्हाला भजन ऐकायचं असेल तर तुम्ही पर्टिक्युलर तेच चॅनेल लावाल, तरच तुम्हाला भजन ऐकू येईल  आणि  तुम्हाला जर लव्ह सॉंग्स ऐकायची असतील तर तुम्हाला ती ज्या रेडिओ स्टेशन ला लागतात त्या चॅनल ला ट्यून करावं लागेल अगदी तसंच असत हे. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे किव्हा ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्याल ती गोष्ट तुमच्यासाठी तुम्ही आकर्षित करता.

तुम्ही जर भूतकाळाचा विचार करत असलात ,किव्हा भविष्यकाळाचा विचार करत असलात तरी आता तुम्ही ज्या वर लक्ष्य केंद्रित करता आहात त्या कंपनांना आकर्षणाचा सिद्धांत प्रतिसाद  देणारच.

आणि इथे तुम्हाला सकारात्मक विचारसरणी चा फायदा होतो ,म्हणजे जे लोक सकारात्मक विचारसरणी स्वीकारत असतात  वर्तमानात जगत असतात .

बाकीचे एक तर भूतकाळात जगत असतात किव्हा भविष्यकाळात . म्हणजे असं कि बऱ्याच लोकांना हि सवय असते कि जे झालं त्या बद्दल च गिल्ट ते मनात सतत बाळगून असतात किव्हा जे झालं ते पुन्हा भविष्यात उद्भवायला नको म्हणून काळजी करत असतात . किव्हा भविष्यकाळात सगळं नीट असेल ना ह्याची चिंता त्यांना असते. पण ते हे विसरतात कि कालच्या भूतकाळामुळे त्यांची आजची रिएलिटी बनली आहे आणि आज चिंता करून आणि तोच तोच विचार करून भविष्यात काय असणार ह्याची तरतूदच ते करत आहेत.

आज तुम्ही काही वेगळं केलंत म्हणजे जे  तुम्हाला भविष्यात  हवं आहे त्यासंदर्भात काही केलात तर ते उद्याला तुमची रिएलिटी बनली असेल.

आपण आकर्षणाचा सिद्धांत कसा वापरायचा हे पाहू या !

असं म्हंटल जात कि दिवसभरात आपण साधारण पणे  ६५००० विचार आपल्या मनात येऊन जातात पण आपण फार थोड्या विचारांवर लक्ष केंद्रित करतो. विचार जेव्हा मनात येतो तेव्हा त्याची कंपन जास्त स्ट्रॉंग नसतात पण तुम्ही जेव्हा त्याच्या कडे लक्ष देता तशी ती स्ट्रॉंग बनतात आणि मग भावना तयार होतात. आणि ह्या  भावनांमुळे च तुम्हाला कधी छान वाटत,कधी दुःख होत.

आकर्षणाच्या सिद्धांताचे तीन टप्पे आहेत.

मागणी करा .

तुमची मागणी पूर्ण होणे

आणि तुमची पूर्ण झालेली मागणी स्वीकारा.

मागणी करा :- तुमच्या मनात एखादी इच्छा तयार होते,ती तुम्ही निसर्गा कडे किव्हा परमेश्वराकडे व्यक्त करता.

परमेश्वर किव्हा निसर्ग तुमची इच्छा पूर्ण करतो.  आणि तिसरी शेवटची अतिशय महत्वाची पायरी कि  तुम्हाला परमेश्वर देत आहे त्याला  स्वीकारण्याची स्वतःला अनुमती देणं.

तिसरा मुद्दा थोडासा नीट समजून घेणं गरजेचं आहे कारण खूप जणांचा असा अनुभव असू शकतो कि आम्ही इच्छा व्यक्त केली ,तरी मिळतेच असं नाही ह्याच कारण असं आहे कि तुम्हाला जी तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं त्या इच्छेचा प्रतिसाद स्विकारण्याच्या मनस्थितीत तुम्ही जर नसाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊनही तुम्हाला ती पूर्ण झाल्यासारखी वाटणार नाही.

ह्याच कारण असं आहे कि तुमची स्पंदन आणि तुमच्या इच्छेची स्पंदन जुळायला हवीत आणि  त्यासाठी तुमची अनुमती हवी. हे थोडस समजायला कठीण जाऊ शकत जर तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर. आज मी एक वेबिनार अटेंड केलं मास्टर आकर्षण ह्यांचं ,ते ह्याच विषयावर बोलत होते,त्यांनी एक उदाहरण सांगितलं. त्यांचा एक शो आहे "आस्क मास्टर एनी थिंग "! त्यामध्ये  काही लोक रॅन्डमली सिलेक्ट केली जातात प्रश्न विचारण्यासाठी, आणि एक व्यक्ती होती जिची  तीव्र इच्छा होती तिला फॅशन इंडस्ट्री मध्ये काम सुरु करायला कोणी इन्व्हेस्टर हवा होता. आणि त्या व्यक्तीचा नं सिलेक्ट केला गेला आणि मास्टर आकर्षण ह्यांनी त्या व्यक्ती ला फोन लावला आणि सांगितलं कि ह्या शो मध्ये ५००० लोकांमधून तुमचा नं प्रश्न विचारण्यासाठी सिलेक्ट केला गेला आहे तर तुमचा प्रश्न विचारा.

त्या व्यक्तीने सांगितलं कि माझी अशी फॅशन इंडस्ट्री मध्ये काम करायची इच्छा आहे आणि मला इन्व्हेस्टर हवा आहे. मी आकर्षणाच्या नियमाचे सर्व पालन करतो तरी माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे. मास्टर आकर्षण त्या व्यक्तीला म्हणाले कि मी पण फॅशन इंडस्ट्री मध्ये इन्व्हेस्ट करतो आहे गेल्या काही वर्षांपासून तुझी काय मागणी आहे, त्या व्यक्तीला काहीही सांगता आलं नाही ,त्याच्या कडे काहीही मुद्दे तयार नव्हते.

ह्या उदाहरणाकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल कि त्याने इच्छा व्यक्त केली,परमेश्वर /निसर्गाने त्याला प्रतिसाद दिला ,पण तो प्रतिसाद स्वीकारायला तयार नव्हता आणि त्यामुळे संधी गमावली.

इथे तुमच्या लक्षात येईल कि तुमची स्पंदन आणि तुमच्या इच्छेची स्पंदन जुळायला लागतात हे किती महत्वाचे आहे. आणि तुम्ही जेव्हा इच्छा व्यक्त करता त्या नंतर तुम्ही स्वतःला कायम  इच्छापूर्ती साठी तयारी ठेवायला हवं.

इच्छापूर्ती साठी स्वतःला कस तयार करायचं हे आपण पुढच्या लेखात पाहू या !

 


सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...