Showing posts with label मराठी बुक रिव्यू. Show all posts
Showing posts with label मराठी बुक रिव्यू. Show all posts

Monday, 11 May 2020

बुक रिव्यू -भगवत गीतेतून शिका सफलतेची सूत्र



बुक रिव्यू -भगवत गीतेतून शिका सफलतेची सूत्र

लेखक - डॉ कपिल कक्कड

लेखक डॉ कपिल कक्कड हे  व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ आहेत त्याच सोबत कार्पोरेट प्रशिक्षक ,सल्लागार,प्रेरक लेखक आणि अध्यात्मिक गुरु आहेत. त्यांनी माईंड कोच नावाची भावनांना संचालित करणारी एक प्रक्रिया शोधून काढली आहे आणि आध्यत्मिक आणि शास्त्रीय तंत्राच्या माध्यमातून तणाव व्यवस्थपणावर काही प्रोग्राम तयार केले आहेत.

पेजेस  १६०

हे पुस्तक भगवत गीतेतील तत्वज्ञान आणि उपदेशांवर आधारित आहे. ह्यामध्ये तणाव ,आत्मविश्वासाचा अभाव ,चिंता दूर करून जीवनात सुख ,शांतात,समाधान मिळवून मानवी जीवन सफल करण्याविषयी मार्गदर्शन केलेले आहे.

भगवत गीता हा विवेक, बुद्धी आणि प्रतिभेचा संगम असणारा ग्रंथ आहे.

भगवत गीतेतील १० व्या अध्यात  भगवान श्रीकृष्ण सांगतात कि "प्रत्येक  जिवंत व्यक्तीच्या हृदयात वास करणारा महान आत्मा म्हणजे मीच आहे ,मीच सर्व जीवांचा  आदि ,मध्य आणि अंत आहे. "

परमेश्वर आपल्या सर्वांचं आतच दडलेला आहे त्यामुळे सर्व समाधान होण्यासाठी आपण आपल्याआतच डोकावायला हवं.

जो पर्यंत तुम्ही परमेश्वर आणि त्याचे नियम समजून घेत नाही तोवर तुम्ही जीवनात यशस्वी हो ,आनंदी होणं शक्य होत नाही. तुम्ही स्वतः आपल्या कर्माने आपले भाग्य निर्माण करत असता. आणि परमेश्वर किव्हा निसर्ग,महाशक्ती तुम्ही जे काही नाव द्याल ते ,ती शक्ती तुम्हाला कर्मा प्रमाणे फळ देत असते. त्यामुळे जीवनात परिपूर्ण सफलता मिळवायची असेल तर निसर्ग नियमनाचे महत्व आणि उपयोगिता समजून घेणे गरजेचे आहे.

भगवान श्रीकृष्णाने भगवतगीतेत  स्पष्ट स्वरूपात सांगितले आहे कि तुम्हाला जर जीवनात सफलता हवी असेल तर तुम्हाला सर्वाना निसर्गाने बनवलेल्या नियमानुसार चालावे लागेल.

कर्मासोबत आसक्ती ठेवू नका. कर्म आपल्या सोबत आहे पण फळ आपल्या हातात नाही. हेच आपण सक्सेस लॉ

मध्ये शिकतो ,कर्मसोबत आसक्ती नाही म्हणजेच लॉ ऑफ डिटॅचमेंट. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात त्याचे विचार आणि कर्म हेच त्याच्या जीवनाचा आधार असतात.

आपली समज आणि चारित्र्य हेच बाह्य जीवनात आपले वागणे आणि आचरण सादर करत असतात. आणि अशा प्रकारे वर्तमान जीवन हे भूतकाळात केलेल्या कर्माची फळ असतात

तुमचं कर्म हे तुमची सफलता,असफलता ,आनंद,दुःख ह्या  सर्वांसाठी साठी जबाबदारअसतं आणि तुमच्या ऊर्जेचा स्त्रोत  हि तुमचं कर्म असत म्हणजेच तुमच्या कडे असणारी सकारात्मक ऊर्जा हे तुमच्या सकरात्मक ,चांगल्या कर्माचे प्रतीक असत आणि नकारात्मक ऊर्जा हि नकारात्मक कार्याचे प्रतीक असत. सकारात्मक दृष्ट्या विचार करत असणारी व्यक्ती नेहमी हाच विचार करत असते ती जे काम करत आहे त्याने समाजाचे ,देशाचे कल्याण होत आहे. आणि तुम्ही जेव्हा असाच विचार करता तेव्हाच तुम्ही यशस्वी बनता अश्या व्यक्तींचा निसर्गाच्या नियमांवर पूर्ण विश्वास असतो. .

ह्या सकरात्मक ऊर्जेच्या प्रवाहात आळस (लेझिनेस ) ,नकारात्मक चिंतन(निगेटिव्ह थॉट्स),हीन भावना(लॅक ऑफ कॉफिडन्स ) ,संकल्पशक्तीचा  अभाव. (गोल सेट नसणं),तणाव (टेन्शन) ह्या सगळ्या गोष्टी अडथळे निर्माण करत असतात. आणि ह्यावर मात करण्यासाठी काही उपाय हि लेखकांनी ह्या पुस्तकात सुचवलेले आहेत. मानवी मेंदू ज्याला आपण मन असं हि म्हणतो हि आपल्याला मिळालेली परमेश्वरीय भेट आहे. मेंदू नियंत्रण म्हणजे मन कसं कंट्रोल करायचं ह्यावर त्यांनी अतिशय सुरेख मार्गदर्शन ह्या पुस्तकामध्यें केलेले आहे. मेडिटेशन ,सकारात्मक विचारांचा सराव  म्हणजेच अफार्मेशन्स ,वर्तमान  काळात जगणे,सात्विक आहार ,नकारात्मक लोकांपासून दूर राहणे ,शिस्त ,विशाल दृष्टीकोन सकारात्मक विचारांवरच कायम फोकस असणे ,आत्म परामर्श म्हणजे तुम्हाला तुमचे चांगले -वाईट गुण  माहिती हवेत. मानसिक चित्रण (विझ्युलायझेशन )हे उपाय सांगितले आहेत. त्याच सोबत परमेश्वरावरचा विश्वास आणि स्वतःवरचा विश्वास हि तेवढाच महत्वाचा आहे.

जीवनात सफलता मिळवण्यासाठी एखादे ध्येय किव्हा उद्देश असणे आवश्यक असते.एखाद्या जीवाचा जन्म आणि अस्तित्व हे सुद्धा निसर्गाने ठरवलेले ध्येयच असते. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करणे खूप गरजेचे असते. तुमच्या जीवनाचा मुख्य उद्देश ओळखा समाधान,सफलता ,प्रसन्नता ,आणि अध्यात्मिकता ह्यातील सर्व किव्हा ह्यातील एक उद्दिष्ट तुमचे असू शकते. सर्वाना भरभरून प्रेम द्या आणि क्षमा करा हे दोन्ही गुण  तुम्हाला परमेश्वराच्या जवळ नेतात. प्रेम म्हणजे फक्त नाते संबन्ध किव्हा स्त्री-पुरुष प्रेम नव्हे तर सर्वाना एकाच पातळीवर समजून भेद भाव करत केलेलं प्रेम ,कारण आपल्या सर्वानाच माहित आहे परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात असतो. स्वतःला ,आजूबाजूच्या लोकांना क्षमा करायला शिका त्यामुळे तुमची नकारात्मक भावनांपासून सुटका होते.

अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि माझी सर्वाना विनंती आहे कि तुम्ही हे पुस्तक जरुर वाचा,ऍमेझॉन वर हे उपलब्ध आहे.

 


Friday, 8 May 2020

बुक रिव्यू - यु कॅन हील युअर लाईफ



ह्या अप्रतिम पुस्तकाच्या लेखिका आहेत लुईस एल हे . 
तुमचं जगण  तुमच्या हाती ! असं घोष वाक्य ह्या पुस्तकात ते आहे. 

लेखिकेबद्दल थोडस :

लुईस हे ह्या अधिव्यख्याता आणि प्राध्यापक आहेत त्याच सोबत बेस्ट सेलर ठरलेल्या २७ पुस्तकांच्या लेखिका आहेत. जगातील २६ भाषांमध्ये त्यांची पुस्तके भाषांतरित झाली आहेत आणि ३५ देशांमध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी निरामय जीवन जगण्याचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन केलेले आहे. 

त्यांच्या विचारसरणीतील काही मुद्दे त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला दिले आहेत आणि मला वाटत कि तेच खूप महत्वाचे मुद्दे आहेत. 

आपल्या प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार असतो. 
आपला प्रत्येक विचार ,आपले भविष्य घडवत असतो. 
वर्तमानकाळाच्या क्षणाक्षणात  नेहमीच शक्ती  साठवलेली असते. 
प्रत्येकजण स्वतःला दोषी आणि अपराधी समजत असतो. 
माझ्या मध्ये काहीही चांगलं नाही,असाच प्रत्येकाला वाटत. 
तो नुसता विचार आहे आणि विचार बदलता येतो. 
आपल्या शरीरात निर्माण होणारे सर्व रोग आपणच निर्माण करत असतो. 
चीड ,टीका आणि अपराधी पानाची भावना हि विचारांची साखळी फार धोकादायक आहे. 
मनातील चीड घालवली तर कॅन्सर सुद्धा बरा होतो. 
आपण भूतकाळ विसरायला हवा आणि सर्वाना माफ करायला हवं. 
आपण स्वतःवर प्रेम करायला  शिकायला हवं. 
स्वतःला आवडून घेणं आणि स्वतःला स्वीकारणं हीच सकरात्मक बदल घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे. 
आपण स्वतःवर खरोखरच प्रेम करायला लागलो ,तर आयुष्यतील प्रेत्येक गोष्ट चांगली व्हायला लागते. 

तुम्ही निवडलेल्या प्रत्येक विचारला ,विश्वासाला जगाकडून कायम च समर्थन मिळत असत त्यामुळे विचार कोणते करायचे हा वैयत्तिक प्रश्न आहे आणि त्या प्रमाणे तुमचं आयुष्य असणार आहे हे मात्र नक्की आहे. तुमच्या समस्या आणि तुमचे अनुभव हे तुमच्या विचारांचे  बाह्य  असतात . 
भूतकाळाबद्दलचा दृष्टिकोन बदलणं हे खूप लोकांना कठीण वाटत आणि त्यांची मानसिक तयारी हि नसते पण जो पर्यंत तुम्ही ते ओझं फेकून देत नाही तोवर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आणि भूतकाळ विसरण्यासाठी तुम्हीं क्षमा करायला शिकायला हवं,तुमचा जर इगो मध्ये येत असेल तर तुम्ही कधीच कुणालाच क्षमा करू शकणार नाही  आहात आणि आनंदी जीवनाला मुकणार आहात. 

"माझ्या अपेक्षेप्रमाणे तू वागला नाही आहेस पण तरीही मी तुला क्षमा करत आहे ,तुला मुक्त करत आहे ",हि सकारात्मकता तुम्हाला मुक्त करते. 

स्वतःवर प्रेम करण ,स्वतःवर कधीही टीका ना करणं ,स्वतःशी प्रेमळ पणे वागणं ह्यामुळे तुम्ही तुमच्यात  खूप मोठा सकारात्मक बदल घडवायला  मदत करत असता. 
आपल्या परिस्थितीला दुसऱ्यांना दोष देणं,आई-वडिलांना दोष देणं हे चुकीचं आहे. आई-वडिलांनी आपल्याला त्यांच्या समजुतीनुसार वागवलेलं असत,त्यांना जशी त्यांच्या आई-वडिलांनी वागवलेलं असत,अनुभव आलेले असतात त्या बेस वर ते आपल्याला वाढवतात. आणि मग तो बेस च जर चुकीचा सेल तर त्यांना दोषी मानणं कितपत योग्य आहे. 

कोणतीही अडचण आल्यानंतर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचार कि "कोणत्या विचारामुळे हि अडचण मी निर्माण केली?" कोणता चुकीचा विचार मी स्वीकारला आणि त्यामुळे हि अडचण अली आहे,ऍनालिसिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तो विचार आणि मग तुम्हाला त्यावरच सोल्युशन हि मिळेल हे नक्की. 

लेखिकेचं ह्या मताशी मी वैयक्तिक हि खूप सहमत आहे कि "तुमचे विचार  तुमचं आयुष्य कस घडवतात,कसे काम करतात " हा विषय शाळेपासूनच शिकवायला हवा. मनाचं कार्य कस चालत ?पैशाचे  व्यवहार,उत्तम पालक कस व्हायचं,नातेसंबंध कसे टिकवायचे हे असे विषय लहान पानापासून हवेत शाळांमध्ये. आजकाल नाते संबंध कसे टिकवायचे ह्याची नीटशी माहिती नसल्यामुळे आणि मन ,मनाचे कार्य ,विचार ह्यांचा आपल्या रोजच्या जीवनात खूप जवळचा संबंध असतो ह्यावर विश्वासच नसल्याने लग्नाळू मुलांच्या किती समस्या निर्माण झाल्या आहेत. 

सहजासहजी लोक बदल स्वीकारायला तयार नसतात. बदल कर म्हंटल कि अनेक कारण पुढे करतात ज्यातून त्यांना हे सुचवायचं असत कि त्यांची कारण अत्यंत व्हॅलिड आहेत आणि नाही होऊ शकत बदल आणि मग हळू हळू त्यांना राग येऊ लागतो. पण ह्या मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी ते विसरतात कि "बदल" हा निसर्गाचा नियम तुम्ही त्याला अपवाद नाही असू शकत आणि तुम्ही  जे  देता तेच परत मिळत ह्या नियमाने तुम्ही जेवढे रंगवलं तेवढी राग निर्माण करण्याची कारण वाढवाल .

पण तुम्हाला जर बदलायला हवं ह्याची जाणीव होत असेल तर मात्र ती चांगली गोष्ट आहे,सकारात्मक बदल तुमच्यात घडतो आहे !
कोणती हि सवय हि गरजेतून निर्माण होते. ज्या सवाई तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्याच तुमची सवय बनलेल्या असतात. हे सगळं जाळं तुम्हीच तुमच्या भोवती विणलेलं असत ,जेव्हा तुम्ही आत्मनिंदा थांबवून स्वतःशी प्रेमाने वागायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला हळू-हळू ह्यातून बाहेर पडायचा मार्ग खुला होतो. 

जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदल्याची असेल तर एक सुंदर वाक्य लेखिकेने सांगितले आहे." ज्या मुळे  माझ्या आयुष्यात प्रश्न निर्माण होतात ती परिस्थितीच मला  बदलवायची आहे."तुमच्या मनात नकारात्मक विचार जेव्हा सातत्याने यायला सुरुवात होतील तेव्हा  हे वाक्य रिपीट करा असं लेखिकेचं सांगणं आहे. 
विचार बदलण्यासाठी चे काही प्रयोग हि लेखिकेने ह्या पुस्तकात दिलेले आहेत. खूप वेळा आपण ऐकतो कि मनावर ताबा ठेवणं शक्य नसत ,पण तस नाही आहे ,मनावर ताबा ठेवता येऊ शकतो. मनापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात आणि मन हे एक साधन आहे आणि तुम्ही ते तुमच्या मर्जी नुसार वापरू शकता. मनाची तुमच्या वर अधिकार गाजवायची सवय तुम्ही नक्कीच मोडू शकता. 

 मनावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही भूतकाळ विसरणं,क्षमाशीलता,काही सवयी ,घटनां पासून मुक्ती,चीड घालवणे,सूड घ्यावा वाटतो त्या व्यक्तींना क्षमा करणे. ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्यात तर तुमचं मन हे तुमच्या ताब्यात येईल. नकरात्मक विचारांशी लढण्यासाठी सकारात्मक विचारांचा कसा वापर करायचा हे त्यांनी उदाहरणासहित ह्या पुस्तकात दिल आहे.
 आर्थिक परिस्थिती ,नोकरी ,तुमचं शरीर ,शारीरिक समस्या  ह्या साठी  त्यांनी सकारात्मक  विचार  (अफार्मेशन्स) खूप छान पद्धतीने मांडले आहेत. काही शारीरिक रोग आणि तो रोग का आहे ह्या मागचा नकारात्मक विचार आणि त्या नकारात्मक विचाराला बदलवणारा सकारात्मक विचार ह्या वरती त्यांनी एक मोठं प्रकरण लिहिलं आहे. 
विचारांना दिशा देऊन आयुष्य बदलायला कशी मदत होते ह्यासाठी च हे उत्तम पुस्तक आहे. 

सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...