Sunday 12 July 2020

सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !


बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर्टिकल लिहायचं आहेच.  मी माझं यु ट्यूब चॅनेल सुरु करत आहे त्यामुळे जरा थोडस वेगवेगळे व्हिडीओ बघणं,कन्टेन्ट वर काम,त्यात कधीही कॅमेरा फेस नाही केला आहे त्यामुळे त्याची प्रॅक्टिस असं सगळं सुरु असल्याने दैनंदिन सगळी काम जरा बाजूलाच पडली,रोज ह्या मंचावर येणं हे खर तर माझ्या दैनंदिन कामाचा च भाग आहे पण...... जरा गॅप पडली. असो.

मी ब्लॉगर आहे आणि सोशल मीडिया वर खूप ऍक्टिव्ह असते,आणि qyora तर माझा सगळ्यात फेव्हरेट प्लॅटफॉर्म आहे कारण इथे लोक माहिती, ज्ञान मिळवण्यासाठी येतात. माझा नोकरीचा अनुभव हा जाहिरात एजन्सी शी  रिलेटेड आहे आणि सोशल मीडिया वर एक्टीव्ह असल्याने खूप लोक मला आमच्या प्रॉडकट प्रोमोशन करून द्याल का असं विचारात असतात.

त्याच संदर्भात  जे अनुभव येतात त्या बद्दल लिहावं असं मनात आलं.

 

लोक जेव्हा प्रोमोशन बद्दल विचारतात तेव्हा त्यांना असं वाटत असत कि डिजिटल प्रोमोशन करणारी व्यक्ती अथवा एजन्सी ला पैसे दिले आणि काम दिल म्हणजे लगेच आपल्या बिझनेस मध्ये खूप मोठी वाढ होणं अपेक्षित आहे कारण ह्या लोकं कडे खूप डेटा असतो आणि आजकाल डेटा ला खूपच किंमत आहे.

 

असं वाटणाऱ्या तमाम लोकांना मला सांगावस वाटत कि कोणत्याही व्यक्तीला,एजन्सीला तुम्ही काम दिल्याने असं होणार नाही आणि जर तस काही तुम्हाला मार्केट मधून मिळत असेल तर ती ग्रोथ ऑरगॅनिक नाही हे सोशल मीडिया चॅनेल्स ना लगेच समजत. आणि डेटा जरी उपलब्ध असला तरी त्यातील किती डेटा हा तुमचा सिरीयस बायर असेल ह्या बद्दल कुणीच काही सांगून नाही शकत. माझा अनुभव हे सांगतो कि सोशल मीडिया प्रोमोशन करून होणार बिझनेस कन्व्हर्जन रेशो हा तसा खूपच कमी असतो. (ह्या क्षेत्रातील लोक अधिक चांगलं सांगतील,मी खूप तज्ञ् नाही ह्यातील,फक्त हे मी माझ्या अनुभवावरून स्टेटमेंट देत आहे.) सोशल मीडियाचा खरा उपयोग तुमच्या ब्रॅण्डिंग साठी जास्त चांगला होतो. आणि तुमचं प्रोडक्ट ब्रँड बनायला तुम्ही सातत्य ,तुमची गुणवत्ता आणि तुमची सर्व्हिस ह्या तीन पिलर्स वर काम कारण जास्त महत्वाचं ठरत.

मला जेव्हा ह्या बद्दल सल्ला विचारलं जातो तेव्हा मी नेहमी समोरच्या व्यक्तीला हे सांगते कि सोशल मीडिया तुमचा ब्रँड अवेअरनेस साठी खूप उपयुक्त आहे पण तुम्ही थोडा धीर धरून सातत्य राखण हि खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया हे टी २० मॅच नाही ते कसोटी क्रिकेट आहे.

 

खूपदा लोक असं हि ऑफर देतात कि तुम्हाला काम दिल्यावर जो बिझनेस जनरेट होईल त्यातलं एवढे % कमिशन तुमचं ! 

अशी ऑफर देणाऱ्या लोकांना माझं सजेशन हे असत कि मग तुम्ही मार्केटिंग ला स्टाफ ठेवा ,पण लोक मार्केटिंगच्या स्टाफ ला जास्त पगार आणि इन्सेन्टिव्ह देण्यापेक्षा हे बरं असा  विचार करतात.

फक्त सोशल मीडिया वरून प्रोमोशन करून संपूर्ण बिझनेस जनरेट होत असतो का ? माझ्या मते ह्याच  उत्तर नाही असं आहे कारण सोशल मीडिया हे एक टूल आहे. 

 

तुमचा बिझनेस वाढायला तुमचं प्रोडक्टची  क्वालिटी ,तुमची पोस्ट डिलिव्हरी सर्व्हिस ,तुमची बॅकऑफिस सिस्टीम ,तुमच्या प्रोडक्ट ची किंमत आणि क्वालिटी चा ताळमेळ ,तुमचे कॉम्पिटिटर चे प्रोडक्ट्स त्यांची सर्विसेस ,सगळ्यात महत्वाचा घटक तुमचा स्टाफ ,तो किती जीव ओतून काम करतो. (म्हणजे त्याला तुमची कंपनी किती आपली वाटते) कारण नुसतं पगार मिळतो म्हणून काम करणारे लोकांना तुमच्या कस्टमर ला काय वाटत ,त्यांना द्यायची सर्व्हिस महत्वाची नाही वाटत.

मग सोशल मीडिया महत्वाचं नाही आहे का ?वापरायचं कशाला उपयोग नसेल तर असं काहींना वाटू शकत !

 

सोशल मीडिया मुळे तुमचा ब्रँड एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहचतो. तुम्हाला तुमचे कॉम्पिटीटर्स काय स्ट्रॅटजी वापरत आहेत,त्यांचे कस्टमर बद्दल काय बोलतात हे समजत . तुमच्या कस्टमर ना हि तुमच्या बद्दल काय वाटत हा रिव्यू तुम्हाला मिळतो आणि तो तुमची सर्व्हिस ,तुमची उत्पादन गुणवत्ता साठी खूप महत्वाचा असतो. तुम्हाला ब्रँड अवेअरनेस मध्ये सोशल मीडिया मुळे भौगोलिक सीमा राहत नाहीत,ब्रँड अवेअरनेस मुळे तुमच्या बिझनेस मध्ये नक्कीच वाढ होते!

तुम्ही योग्य seo स्ट्रॅटजी वापरलीत तर तुमची वेबसाईट रँक व्हायला मदत होते.

 

त्यामुळे सोशल मीडिया जरूर वापरावं बिझनेस प्रोमोशन साठी पण सर्वस्वी त्यावरून तुमचा बिझनेस जनरेट होईल अशी अपेक्षा ठेवू नये अशी विनंती !

 

 


सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...