Tuesday 27 March 2018

पैसा काय आहे?


आपण सगळे जण ह्या भौतिक जगात राहतो जिथे आपल्याला सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत प्रत्येक गोष्टी साठी पैसे लागतात.पैसा हि एक प्रकारची उर्जा आहे आणि एक प्रकारची ताकद आहे.तुम्हाला कदाचित माहित नसेल पण पैसा हा काही वैश्विक नियम पाळतो. बहुतेकदा अनेकांच्या मनात पैश्याबद्द्ल काही न काही नकारात्मक भावना असते आणि त्यामुळे ते पैसा मिळवण्यासाठी नेहमी फक्त धडपड करत राहतात आणि पैसा त्यांच्या पासून लांब च राहतो.

पैसा हे एक खर तर माध्यम आहे. तुमच जे काही आयुष्य ज्या पद्धतीच आहे पैसा फक्त ते वाढवण्याच काम करतो. तुमच्या कडे पैसा असेल तर तुम्ही आनंदी असता आणि राहता ही. पैसा आपल्या सर्व गरजा सर्व इच्छा पूर्ण करतो त्यामुळे त्याला आपण आपल्या सगळ्यात जवळचा मानला पाहिजे.  

तुमचा जवळचा मित्र असे जेव्हा तुम्ही मानाल तेव्हा तुमच्या मनात पैश्याबद्द्ल नेहमी चांगली भावना ,सकरात्मक भावना असेल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत आणि सुखी होऊ शकणार आहात.

सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत, 
पैसा हा पैश्या कडेच खेचला जातो
नोकरी करून श्रीमंत होता येत नाही
समाधानी राहा.
काटकसरी राहा
अंथरून पाहून पाय पसारा 
हे आणि असे अनेक विचार आपल्या सर्वांच्या मनात लहानपणापासूनवर्षानु वर्षे रुजवले गेलेले असतात अगदी कळत-न कळत आणि हे सगळे पैश्या बद्दलचे निगेटिव्ह विचार आहेत आणि त्यमुळे आपल्या प्रगती मध्ये अडथळे येत असतात आणि आपण मात्र नशीब खराब आहे इ. काही पुन्हा एकदा आपण मनात ग्रह करून घेतो पण ह्या सगळ्यावर चांगला उपाय आहे आपण जर आपला पैश्या बद्दल चा दृष्टीकोन बदलला तर आपल्याला संधी प्राप्त होतील,प्रगती मधले अडथळे दूर होतील आणि आपण मनासारखे पैसे कमवून सुखी होऊ शकतो.

Monday 26 March 2018

पैसा आणि आनंदी मन


आपल मन आनंदी असण्याचा आणि पैसे कमवण्याचा खूप जवळचा संबंध आहे. मन आनंदी असल कि तुमचा दिवस छान जातो आणि तुम्हाला दिवसभर  सकरात्मक उर्जा मिळते ज्या मुळे तुम्ही मिळणाऱ्या संधीचा फायदा घेऊ शकता आणि श्रीमंत बनू शकता. या सगळ्या साठी दिवसाची सुरुवात फार महत्वाची आहे नाही का?
दिवसाची सुरुवात छान होण्यासाठी आपण काय केल पाहिजे ते आता आपण पाहू या. साधरण पणे आपण जेव्हा उठत असतो तेव्हाच आपल्या मनात हे विचार सुरु होतात कि आज दिवसभरात काय काय करायचं आहे ? काय काम आहेत इ. पण  ही सवय चुकीची आहे. खर तर सकाळी उठल्यावर तुम्ही १० मिनिट मेडीटेशन केल पाहिजे.
त्या मध्ये डोळे मिटून शांत बसल्यावर  थोडा वेळ तुमच्या मनातील सगळे चांगले वाईट विचार ,राग,दुखः इ संदर्भातील विचार येतील ते येऊन जाऊ देत आणि मन पुन्हा शुध्द ,ताजतवान होऊ दे त्या नंतर तुम्ही तुमच्या शरीरावर फोकस करा.तुमच्या पंचेन्द्रीयानसोबत सकाळच शुध्द वातावरणचा अनुभव घ्या.तुमच्या पंचेद्रीयान बद्दल कृतज्ञतेची भावना उत्पन्न करा. आणि स्वतला विश्वास द्या कि आजचा दिवस छान जाणार आहे.
ह्या मुळे तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळेल आणि तुमचा दिवस छान जाईल.


सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...