Friday 29 December 2017

प्रत्येक गोष्ट जगात दोनदा घडते !!

नमस्कार !

मन हे निर्मितीक्षम असते मनामध्ये अनेक विचार येत असतात आणि जात असतात, आपल्या आजूबाजूला ही घडणाऱ्या गोष्टीन चा आपल्या मनावर परिणाम होत असतो ,काही घटना न मुळे आपल्याला त्रास  ही होतो.

पण कधी तुम्ही ह्या गोष्टी चा विचार केला आहे का कि हे अस का घडत? किव्हा तुम्ही खूप वेळा बोलताना ऐकलेलं असत मला अमुक घडेल अस वाटतच होत आणि ते घडल ..... कधी याचा विचार केलाय अस का होत ते?

ह्या च कारण अस आहे कि जग हे विचारांवर चालत. कोणती ही गोष्ट कुणीच विचार न करता  करूच शकत नाही.प्रत्येक गोष्ट जगात दोनदा घडते,ती गोष्ट पहिल्यांदा मनात घडलेली असते आणि नंतर प्रत्यक्षात घडते.

अगदी साध रोजच्या जीवनातील उदाहरण आपण बघू या. जेव्हा आपल्याला काही खरेदी करायची असते तेव्हा आपण मार्केट मध्ये गेल्यावर आपल्याला कोणत्या दुकांत जायचं आहे,कोणत्या ब्रांड ची वस्तू घ्याययची आहे किती बजेट असणार आहे हे सगळ ठरलेल असत कारण आपण आधीच मनात विचार केलेला असतो.
आपण अजून एखादे  उदाहरण पाहू या.
सर्वसामान्य लोकांमध्ये मुलांनी काही हट्ट केला आणि तो पुरवणे आई वडिलांना शक्य नसते तेव्हा ते सांगतात कि अरे आपल्याला होम लोन चे हप्ते आहेत,इतर महिन्याचे खर्च आहेत म्हणून तुझा हट्ट पुरवण शक्य नाही. ह्या प्रसंगामध्ये आई -वडील त्यांच्या समोर असणाऱ्या अडचणीचाच आणि मर्यादांचाच  विचार करताना दिसतात त्यामुळे त्याचं मन त्याच गोष्टीना प्रतिसाद देते.म्हणून त्या अडचणींवर मार्ग काढायच्या ऐवजी आपण आपल्या इच्छा कश्या पूर्ण नाही करू शकत हेच नकळत मुलांना शिकवतो.
म्हणजेच जो आपण विचार करतो त्या गोष्टीना आपल मन प्रतीसाद देत असत.मग आपण संपत्ती निर्माण साठी जाणीवपूर्वक विचार केला तर आपण ती नक्कीच मिळवणार आहोत नाही का ?
कारण आपल्या मन खूप सृजनशील आहे. जी तुमची स्वप्न आहेत,ध्येय आहेत त्या संदर्भात तुम्ही सतत जेव्हा विचार कराल तेव्हा तुमच मन त्याला नक्की प्रतिसाद देईल आणि त्या प्रमाणे तुम्हाला संधी प्राप्त होतील आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल.

 पैश्याबाद्द्ल सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टीकोण तुम्हाला तुमच ध्येय गाठण्यात मदत करेल.
धन्यवाद !!
श्रीमंत व्हा आणि सुखी व्हा!

Saturday 23 December 2017

मनातील पैसा


                                                                   
नमस्कार!!!
प्रत्येकाची स्वतःची स्वप्न असतात आणी ती पूर्ण करायला पैसा खूपच महत्वाचा असतो.हा पैसा मिळवण्यासाठी, पैशाच महत्व लक्षात येण्यासाठी आपण खर तर वेगळे कष्ट घेत नाही.
आपण सगळेच जण चरितार्थासाठी पैसे कमावतो,पण त्या पैशातून आपल्या स्वप्न पूर्ती साठी  काहीच तरतूद करू शकत नाही.

पैसे कमावणे किंव्हा संपत्ती निर्माण करणे या साठी आपण ठराविक, चाकोरी बद्ध च विचार करतो कारण आपल्याला आपल्या आजूबाजू च्या लोकांकडून  किंव्हा घरातून तशीच शिकवण दिलेली असते.
प्रत्यक्षात चरितार्थ साठी पैसे कमावणे आणि संपत्ती निर्माण करणे ह्यात खूप फरक आहे.

पैसे कमाविणे म्हणजे आपण आपला वेळ आणि आपले श्रम दिल्यावर मिळणारा मोबदला असतो. संपत्ती निर्माण म्हणजे आपण आपली कल्पकता अन आपली हुशारी आपले कौश्यल यांचा सुंदर मिलाफ असतो.

आपण खुपदा अस लोकांना बोलताना ऐकतो कि पैसा हा नेहमी पैश्या कडेच जातो. श्रीमंत लोकांकडेच तो नेहमी असतो आणि जातो हि .समाजातील इतर घटकांसाठी ते एक दिवा स्वप्न च असत  आणि हे अस काही तुम्हाला हि वाटत असेल तर आपण स्वतःमध्ये  पैश्याबद्द्ल सकारात्मक भावना तयार करण खूप आवश्यक आहे कारण सकारात्मकता आणि संपत्ती निर्माण याचा खूप जवळचा संबंध आहे.


संपत्ती निर्माण साठी आपल्यात सकारात्मक भावना असण खूप आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीकोन  आपल्याला ध्येय निश्चित करण्यात मदत करतो. तसच आपला आत्मविश्वास ही वाढवतो. सकारात्मक विचार,सकारात्मक बोलण आपला प्रत्येक घटने कडे बघायचा दृष्टीकोन बदलवते.  

त्या मुळे आपल्याल नक्की काय हवे आहे आयुष्यात, काय मिळवायचे आहे आणि त्यासाठी काय केल पाहिजे हे समजायला मदत होते.संपत्ती निर्माण करण्याचे सकारात्मक मार्ग आपल्याला सापडतात.

मी ह्या "मनातील पैसा " ह्या ब्लॉग मध्ये ह्याच सगळ्या गोष्टींवर लिहिणार आहे.

श्रीमंत व्हा आणि सुखी व्हा!!

सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...