Saturday 30 May 2020

वर्क फ्रॉम होम सुरु आहे ,पोमोडोरो टेक्निक वापरा आणि दिवसभर फ्रेश राहा !


सध्या आपण सगळे लॉक डाऊन मुळे घरी आहोत आणि बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे ,आणि काही कंपन्यांनी तर आता दीर्घ काळासाठी   आता वर्क फ्रॉम होम सांगितलं आहे. वर्क फ्रॉम होम करत असताना तास तास लॅपटॉप वर काम करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण उठायचा कंटाळा करतो,कामाची लिंक तुटते असं आपल्यला वाटत किव्हा हे एवढं कंप्लिट करू आणि मग थोडा मोठा म्हणजे १५ मिनिट  चा ब्रेक घेऊ असं काहीस वाटत किव्हा काहींना नंतर मूड राहणार नाही  त्या पेक्षा कंप्लिट करा आहे ते असं वाटत. पण ह्या मध्ये आपण आपल्या वरचा कामाचा ताण वाढवून घेत असतो. सलग काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो.

मी काही दिवसांपूर्वी "पोमोडोरो" नावाचं टाइम मॅनेजमेंट टेक्निक बद्दल वाचलं,मी ते वापरायला सुरुवात केली ,मला छान वाटलं,इझी वाटलं आणि मेनली मला माझी प्रॉडक्त्विटी  थोडी वाढल्यासारखी वाटली. कारण माझं अलीकडे  माझ्या कामाचं शेड्युल सगळं थोडस डिस्टरब झाल्या सारखं मला वाटत होत ,म्हणजे मी रोजचे डेली टास्क आदल्या दिवशी झोपायच्या आधी लिहिलेले असतात,कामाला सुरुवात हि वेळेत करत होते ,पण एक काम सुरु केलं कि त्यात अजून अजून गुंतणं होत होत,सो त्याच्या पुढच्या नियोजित कामाला उशीर असं सगळं दिवसभर व्हायचं आणि मग एन्ड ऑफ  द डे  मला टेन्शन यायचं कि ठरवलेल्यातील ३० % काम राहून गेली आहेत मग उद्या च गणित चुकायला नको म्ह्णून ती वीकली ऑफ च्या दिवशी मॅनेज करा म्हणजे विकली ऑफ ला स्वतःसाठी काढलेला वेळ ह्या कामाला द्यायचा म्हणजे एक प्रकारे स्वतःची प्रगती थांबवण्यासारखं च आहे नाही का !

आणि जेव्हा पासून मी "पोमोडोरो" टेक्निक वापरायला लागले तस कामात सुटसुटीत पण आला माझा मला स्वतःवर ट्रॅक ठेवता येऊ लागला कि एखाद काम किती वेळ करायचं आहे, आणि किती वेळात संपवायचं आहे. फिलिंग ग्रेट !

बरं आता पाहू काय आहे हे "पोमोडोरो  टेक्निक?"

 ८० च्या  दशकामध्ये Francesco Cirillo  ह्यांनी ह्या टेक्निक चा शोध लावला होता. ह्या मध्ये आपल्या वेळाचे  २५ मिनिटाचे स्लॉट तयार करायचे असतात आणि २५ मिनिटं नंतर तुम्ही मिनिट चा ब्रेक घ्यायचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं ह्या ब्रेक मध्ये तुम्ही जागे वरून कंपलसरी उठायचं असत आणि परत २५ मिनिटं  काम आणि मिनटं  ब्रेक असे आपले सायकल झाले कि  म्हणजे तुमचं १०० मिनिट काम झालं कि १५ मिनिटं ब्रेक असं संपूर्ण दिवस भर करायचं असत.

ह्या टेक्निक मुळे  होणारे फायदे :-

ह्या मुळे कामातलं कॉन्सन्ट्रेशन वाढत. अगदी मोबाईल समोर असला,एखादा फोन आला तरी तुम्ही तो लगेच अटेंड न करता ५ मिनिटाच्या ब्रेक मध्ये करू शकता.

माईंड फ्रेश राहत.

न थकता तुम्ही अधिक काळा पर्यंत काम करू शकता.

काम टाळणं किव्हा पोस्टपोन करण्याचे प्रमाण कमी होते.

कार्यक्षमता वाढते.

टार्गेट पूर्ण करण्याची शक्यता वाढीस लागते. 

 

आणि ह्या सोबत एका वेळी एकच काम करण्याची सवय लागते कारण आजकाल आपण एकीकडे व्हाट्स अप ,फेसबुक,इंस्टग्राम  पाहत  काम  करत असतो.

ठराविक वेळानंतर ब्रेक घेत असल्याने तुम्ही त्या वेळेत पाणी पिऊन डिहायड्रेशन हि टाळू शकता.

मला ह्या टेक्निक चा खरंच खूपच फायदा होत आहे,तुम्ही हि वापरून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा.


No comments:

Post a Comment

सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...