नमस्कार!!!
प्रत्येकाची स्वतःची स्वप्न असतात आणी
ती पूर्ण करायला पैसा खूपच महत्वाचा असतो.हा पैसा मिळवण्यासाठी, पैशाच महत्व
लक्षात येण्यासाठी आपण खर तर वेगळे कष्ट घेत नाही.
आपण सगळेच जण चरितार्थासाठी पैसे
कमावतो,पण त्या पैशातून आपल्या स्वप्न पूर्ती साठी काहीच तरतूद करू शकत नाही.
पैसे कमावणे किंव्हा
संपत्ती निर्माण करणे या साठी आपण ठराविक, चाकोरी बद्ध च विचार करतो कारण आपल्याला
आपल्या आजूबाजू च्या लोकांकडून किंव्हा
घरातून तशीच शिकवण दिलेली असते.
प्रत्यक्षात चरितार्थ साठी पैसे
कमावणे आणि संपत्ती निर्माण करणे ह्यात खूप फरक आहे.
पैसे कमाविणे म्हणजे आपण आपला
वेळ आणि आपले श्रम दिल्यावर मिळणारा मोबदला असतो. संपत्ती निर्माण म्हणजे आपण आपली
कल्पकता अन आपली हुशारी आपले कौश्यल यांचा सुंदर मिलाफ असतो.
आपण खुपदा अस लोकांना बोलताना ऐकतो कि पैसा हा नेहमी पैश्या कडेच
जातो. श्रीमंत लोकांकडेच तो नेहमी असतो आणि जातो हि .समाजातील इतर घटकांसाठी ते एक
दिवा स्वप्न च असत आणि हे अस काही तुम्हाला
हि वाटत असेल तर आपण स्वतःमध्ये पैश्याबद्द्ल सकारात्मक भावना तयार करण खूप आवश्यक आहे कारण
सकारात्मकता आणि संपत्ती निर्माण याचा खूप जवळचा संबंध आहे.
संपत्ती निर्माण साठी आपल्यात
सकारात्मक भावना असण खूप आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला ध्येय निश्चित करण्यात मदत करतो. तसच
आपला आत्मविश्वास ही वाढवतो. सकारात्मक विचार,सकारात्मक बोलण आपला प्रत्येक घटने
कडे बघायचा दृष्टीकोन बदलवते.
त्या मुळे आपल्याल नक्की काय हवे आहे आयुष्यात, काय
मिळवायचे आहे आणि त्यासाठी काय केल पाहिजे हे समजायला मदत होते.संपत्ती निर्माण
करण्याचे सकारात्मक मार्ग आपल्याला सापडतात.
मी ह्या "मनातील पैसा " ह्या ब्लॉग मध्ये ह्याच सगळ्या गोष्टींवर लिहिणार आहे.
श्रीमंत व्हा आणि सुखी व्हा!!

खूप सुंदर लेखन
ReplyDelete