आपल मन आनंदी असण्याचा आणि पैसे कमवण्याचा खूप जवळचा संबंध आहे. मन
आनंदी असल कि तुमचा दिवस छान जातो आणि तुम्हाला दिवसभर सकरात्मक उर्जा मिळते ज्या मुळे तुम्ही
मिळणाऱ्या संधीचा फायदा घेऊ शकता आणि श्रीमंत बनू शकता. या सगळ्या साठी दिवसाची
सुरुवात फार महत्वाची आहे नाही का?
दिवसाची सुरुवात छान होण्यासाठी आपण काय केल पाहिजे ते आता आपण पाहू
या. साधरण पणे आपण जेव्हा उठत असतो तेव्हाच आपल्या मनात हे विचार सुरु होतात कि आज
दिवसभरात काय काय करायचं आहे ? काय काम आहेत इ. पण ही सवय चुकीची आहे. खर तर सकाळी उठल्यावर
तुम्ही १० मिनिट मेडीटेशन केल पाहिजे.
त्या मध्ये डोळे मिटून शांत बसल्यावर
थोडा वेळ तुमच्या मनातील सगळे चांगले वाईट विचार ,राग,दुखः इ संदर्भातील
विचार येतील ते येऊन जाऊ देत आणि मन पुन्हा शुध्द ,ताजतवान होऊ दे त्या नंतर
तुम्ही तुमच्या शरीरावर फोकस करा.तुमच्या पंचेन्द्रीयानसोबत सकाळच शुध्द वातावरणचा
अनुभव घ्या.तुमच्या पंचेद्रीयान बद्दल कृतज्ञतेची भावना उत्पन्न करा. आणि स्वतला
विश्वास द्या कि आजचा दिवस छान जाणार आहे.
ह्या मुळे तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळेल आणि तुमचा दिवस छान जाईल.
मस्त blog मॅडम
ReplyDelete