Friday 8 May 2020

बुक रिव्यू - यु कॅन हील युअर लाईफ



ह्या अप्रतिम पुस्तकाच्या लेखिका आहेत लुईस एल हे . 
तुमचं जगण  तुमच्या हाती ! असं घोष वाक्य ह्या पुस्तकात ते आहे. 

लेखिकेबद्दल थोडस :

लुईस हे ह्या अधिव्यख्याता आणि प्राध्यापक आहेत त्याच सोबत बेस्ट सेलर ठरलेल्या २७ पुस्तकांच्या लेखिका आहेत. जगातील २६ भाषांमध्ये त्यांची पुस्तके भाषांतरित झाली आहेत आणि ३५ देशांमध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी निरामय जीवन जगण्याचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन केलेले आहे. 

त्यांच्या विचारसरणीतील काही मुद्दे त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला दिले आहेत आणि मला वाटत कि तेच खूप महत्वाचे मुद्दे आहेत. 

आपल्या प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार असतो. 
आपला प्रत्येक विचार ,आपले भविष्य घडवत असतो. 
वर्तमानकाळाच्या क्षणाक्षणात  नेहमीच शक्ती  साठवलेली असते. 
प्रत्येकजण स्वतःला दोषी आणि अपराधी समजत असतो. 
माझ्या मध्ये काहीही चांगलं नाही,असाच प्रत्येकाला वाटत. 
तो नुसता विचार आहे आणि विचार बदलता येतो. 
आपल्या शरीरात निर्माण होणारे सर्व रोग आपणच निर्माण करत असतो. 
चीड ,टीका आणि अपराधी पानाची भावना हि विचारांची साखळी फार धोकादायक आहे. 
मनातील चीड घालवली तर कॅन्सर सुद्धा बरा होतो. 
आपण भूतकाळ विसरायला हवा आणि सर्वाना माफ करायला हवं. 
आपण स्वतःवर प्रेम करायला  शिकायला हवं. 
स्वतःला आवडून घेणं आणि स्वतःला स्वीकारणं हीच सकरात्मक बदल घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे. 
आपण स्वतःवर खरोखरच प्रेम करायला लागलो ,तर आयुष्यतील प्रेत्येक गोष्ट चांगली व्हायला लागते. 

तुम्ही निवडलेल्या प्रत्येक विचारला ,विश्वासाला जगाकडून कायम च समर्थन मिळत असत त्यामुळे विचार कोणते करायचे हा वैयत्तिक प्रश्न आहे आणि त्या प्रमाणे तुमचं आयुष्य असणार आहे हे मात्र नक्की आहे. तुमच्या समस्या आणि तुमचे अनुभव हे तुमच्या विचारांचे  बाह्य  असतात . 
भूतकाळाबद्दलचा दृष्टिकोन बदलणं हे खूप लोकांना कठीण वाटत आणि त्यांची मानसिक तयारी हि नसते पण जो पर्यंत तुम्ही ते ओझं फेकून देत नाही तोवर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आणि भूतकाळ विसरण्यासाठी तुम्हीं क्षमा करायला शिकायला हवं,तुमचा जर इगो मध्ये येत असेल तर तुम्ही कधीच कुणालाच क्षमा करू शकणार नाही  आहात आणि आनंदी जीवनाला मुकणार आहात. 

"माझ्या अपेक्षेप्रमाणे तू वागला नाही आहेस पण तरीही मी तुला क्षमा करत आहे ,तुला मुक्त करत आहे ",हि सकारात्मकता तुम्हाला मुक्त करते. 

स्वतःवर प्रेम करण ,स्वतःवर कधीही टीका ना करणं ,स्वतःशी प्रेमळ पणे वागणं ह्यामुळे तुम्ही तुमच्यात  खूप मोठा सकारात्मक बदल घडवायला  मदत करत असता. 
आपल्या परिस्थितीला दुसऱ्यांना दोष देणं,आई-वडिलांना दोष देणं हे चुकीचं आहे. आई-वडिलांनी आपल्याला त्यांच्या समजुतीनुसार वागवलेलं असत,त्यांना जशी त्यांच्या आई-वडिलांनी वागवलेलं असत,अनुभव आलेले असतात त्या बेस वर ते आपल्याला वाढवतात. आणि मग तो बेस च जर चुकीचा सेल तर त्यांना दोषी मानणं कितपत योग्य आहे. 

कोणतीही अडचण आल्यानंतर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचार कि "कोणत्या विचारामुळे हि अडचण मी निर्माण केली?" कोणता चुकीचा विचार मी स्वीकारला आणि त्यामुळे हि अडचण अली आहे,ऍनालिसिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तो विचार आणि मग तुम्हाला त्यावरच सोल्युशन हि मिळेल हे नक्की. 

लेखिकेचं ह्या मताशी मी वैयक्तिक हि खूप सहमत आहे कि "तुमचे विचार  तुमचं आयुष्य कस घडवतात,कसे काम करतात " हा विषय शाळेपासूनच शिकवायला हवा. मनाचं कार्य कस चालत ?पैशाचे  व्यवहार,उत्तम पालक कस व्हायचं,नातेसंबंध कसे टिकवायचे हे असे विषय लहान पानापासून हवेत शाळांमध्ये. आजकाल नाते संबंध कसे टिकवायचे ह्याची नीटशी माहिती नसल्यामुळे आणि मन ,मनाचे कार्य ,विचार ह्यांचा आपल्या रोजच्या जीवनात खूप जवळचा संबंध असतो ह्यावर विश्वासच नसल्याने लग्नाळू मुलांच्या किती समस्या निर्माण झाल्या आहेत. 

सहजासहजी लोक बदल स्वीकारायला तयार नसतात. बदल कर म्हंटल कि अनेक कारण पुढे करतात ज्यातून त्यांना हे सुचवायचं असत कि त्यांची कारण अत्यंत व्हॅलिड आहेत आणि नाही होऊ शकत बदल आणि मग हळू हळू त्यांना राग येऊ लागतो. पण ह्या मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी ते विसरतात कि "बदल" हा निसर्गाचा नियम तुम्ही त्याला अपवाद नाही असू शकत आणि तुम्ही  जे  देता तेच परत मिळत ह्या नियमाने तुम्ही जेवढे रंगवलं तेवढी राग निर्माण करण्याची कारण वाढवाल .

पण तुम्हाला जर बदलायला हवं ह्याची जाणीव होत असेल तर मात्र ती चांगली गोष्ट आहे,सकारात्मक बदल तुमच्यात घडतो आहे !
कोणती हि सवय हि गरजेतून निर्माण होते. ज्या सवाई तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्याच तुमची सवय बनलेल्या असतात. हे सगळं जाळं तुम्हीच तुमच्या भोवती विणलेलं असत ,जेव्हा तुम्ही आत्मनिंदा थांबवून स्वतःशी प्रेमाने वागायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला हळू-हळू ह्यातून बाहेर पडायचा मार्ग खुला होतो. 

जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदल्याची असेल तर एक सुंदर वाक्य लेखिकेने सांगितले आहे." ज्या मुळे  माझ्या आयुष्यात प्रश्न निर्माण होतात ती परिस्थितीच मला  बदलवायची आहे."तुमच्या मनात नकारात्मक विचार जेव्हा सातत्याने यायला सुरुवात होतील तेव्हा  हे वाक्य रिपीट करा असं लेखिकेचं सांगणं आहे. 
विचार बदलण्यासाठी चे काही प्रयोग हि लेखिकेने ह्या पुस्तकात दिलेले आहेत. खूप वेळा आपण ऐकतो कि मनावर ताबा ठेवणं शक्य नसत ,पण तस नाही आहे ,मनावर ताबा ठेवता येऊ शकतो. मनापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात आणि मन हे एक साधन आहे आणि तुम्ही ते तुमच्या मर्जी नुसार वापरू शकता. मनाची तुमच्या वर अधिकार गाजवायची सवय तुम्ही नक्कीच मोडू शकता. 

 मनावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही भूतकाळ विसरणं,क्षमाशीलता,काही सवयी ,घटनां पासून मुक्ती,चीड घालवणे,सूड घ्यावा वाटतो त्या व्यक्तींना क्षमा करणे. ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्यात तर तुमचं मन हे तुमच्या ताब्यात येईल. नकरात्मक विचारांशी लढण्यासाठी सकारात्मक विचारांचा कसा वापर करायचा हे त्यांनी उदाहरणासहित ह्या पुस्तकात दिल आहे.
 आर्थिक परिस्थिती ,नोकरी ,तुमचं शरीर ,शारीरिक समस्या  ह्या साठी  त्यांनी सकारात्मक  विचार  (अफार्मेशन्स) खूप छान पद्धतीने मांडले आहेत. काही शारीरिक रोग आणि तो रोग का आहे ह्या मागचा नकारात्मक विचार आणि त्या नकारात्मक विचाराला बदलवणारा सकारात्मक विचार ह्या वरती त्यांनी एक मोठं प्रकरण लिहिलं आहे. 
विचारांना दिशा देऊन आयुष्य बदलायला कशी मदत होते ह्यासाठी च हे उत्तम पुस्तक आहे. 

No comments:

Post a Comment

सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...