Tuesday 26 May 2020

इच्छापूर्ती साठी स्वतःला कस तयार करायचं?

मागील लेखामध्ये आपण पाहिलं कि आकर्षणाचा सिद्धांत काय असतो आणि तो कस काम करतो.

आकर्षणाच्या सिद्धांताचे तीन टप्पे आहेत.

मागणी करा . आवश्यक ती कृती करणं हे आपल्या हातात असत आणि

तुमची मागणी पूर्ण होणे

आणि तुमची पूर्ण झालेली मागणी स्वीकारा.

मागणी करा :- तुमच्या मनात एखादी इच्छा तयार होते,ती तुम्ही निसर्गा कडे किव्हा परमेश्वराकडे व्यक्त करता.

परमेश्वर किव्हा निसर्ग तुमची इच्छा पूर्ण करतो.

 आणि तिसरी शेवटची अतिशय महत्वाची पायरी कि  तुम्हाला परमेश्वर देत आहे त्याला  स्वीकारण्याची स्वतःला अनुमती देणं.

जेव्हा तुमची स्पंदन आणि निसर्गाची स्पंदन मॅच होतात ,तेव्हा तुमची इच्छा पूर्ती होते. आणि ह्या साठी जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता तेव्हा पासून तुम्ही स्वतःला यश स्वीकारण्यासाठी तयार करण गरजेचं असत. कारण इच्छा व्यक्त करणं ,त्यासाठी काम करणं म्हणजेच योग्य ती कृती करणं हे आपल्या हातात असतं आणि त्याच फळ देणं हे निसर्गाचं किव्हा परमेश्वराचं काम असत.

खूप वेळा आपणच आपल्या विचारांनी आपल्या इच्छा पूर्तीच्या मार्गात नकळत अडथळे निर्माण करत असतो.

सतत ची काळजी करणं ,नीट होईल ना असा सातत्याने विचार करणं . ह्या मुळे तुमची नकारात्मक भावना ना

खत -पाणी घालता आणि स्वतःच स्वतःच्या मार्गात अडथळे निर्माण करता. आणि ही नकारात्मक भावना निर्माण होते कारण तुमचा स्वतःवर विश्वास नसतो.

तुमचा विश्वास हा तुमच्या पात्रतेविषयीचे समज किव्हा विचार पक्के करत असतो. तुमचा स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी तुम्ही रोज सकारात्मक अफिरमेशन वाचली पाहिजेत. रोज तुमची ध्येय लिहून काढा. (आजकाल खूप सारी डायरी ची ऍप उपलब्ध आहेत पण ती वापरू नका,कारण जेव्हा तुम्ही हाताने लिहिता तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती अधिक अटॅच होता.)

व्हिजन बोर्ड तयार करा. व्हिजन बोर्ड अश्या ठिकाणी लावा कि तुम्हाला तो सतत दिसेल आणि त्यावर तुमच्या स्वप्ननाची चित्र लावा. असं म्हणतात कि एक चित्र अनेक शब्दांचं काम करत. का,कसं असे प्रश्नांना मनात येऊ देऊ नका.  ह्या नंतर चा महत्वाचा मुद्दा आहे कृती. तुम्ही जर आवश्यक ती कृती केलीच नाही तर तुम्हाला संधी मिळणार नाही आणि इच्छापूर्ती हि होणार नाही.

कोणतीही गोष्ट मिळवताना भावना,विश्वास ,विचार आणि कृती ह्या चारही गोष्टी लागतात.

तुम्ही कधीही कुणाशी हि जेव्हा संवाद साधता तेव्हा तुम्ही तुमचं बोलणं ऐकता का ? मी असं इथे सुचवू इच्छिते कि हे वाक्य तुम्ही नीट लक्ष्य देऊन वाचा आणि मिनिट थांबून आठवा कि खरंच तुम्ही तुमचं बोलणं ऐकता का ? बरेच लोकांना माहीतच नसत कि ते काय बोलत आहेत (जरा विचित्र वाटेल पण हि वास्तवता आहे )लोक खरंच स्वतःचे शब्द ऐकत नसतात. तुम्ही काय बोलता आहात हे ऐकायला शिकलात कि तुमचं तुम्हालाच समजायला लागत कि आपले विचार चुकीचे आहेत कि बरोबर आहेत ते. आकर्षणाच्या सिद्धांताच्या बाबतीत हि हेच होत ,तुम्ही एखादी इच्छा मनात बाळगून असता आणि त्या बद्दल अगदी कॉन्फिडन्ट असता,व्हिजन बोर्ड ,अफिरमेशन सगळं नीट प्रोसिजर फॉलो करता पण कुणाशी संवाद करताना जर असं म्हणत असाल कि "बघू यार ट्राय तर केलाय,काय माहित काय होईल?नाही झालंच तर मग बघू काय करायचं ते  ! " आता ह्या वाक्यातून तुम्ही युनिव्हर्सल पॉवर वर आणि स्वतःवर शंका व्यक्त केली,काळजी दिसली बरोबर ? म्हणजे मनातले विचार आणि कृती ह्याचा ताळमेळ नाही आहे. आपल्या प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा असते ,तुम्ही जेव्हा नकारात्मक शब्द उच्चारता तेव्हा  नकारात्मक ऊर्जा वातावरणामध्ये  ट्रान्स्मिट करता आणि स्वतःच नवीन अडथळा बनवता !

म्हणजेच तुमचं कायम कम्युनिकेशन हे सकरात्मक हवं म्हणजे तुम्ही सकरात्मक ऊर्जा ट्रान्स्मिट कराल आणि चांगल्या हव्या असणाऱ्या गोष्टी आकर्षित कराल.

तुमच्या दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. अगदी सगळ्या माणसांबरोबरच वस्तूंविषयी हि कृतज्ञता व्यक्त करा.आज तुमच्या कडे जे काही आहे त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि त्याच सोबत जे हवं आहे त्या बद्दल हि कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा. कृतज्ञता आपण कधी व्यक्त करतो ,जेव्हा आपल्याला काही मिळत तेव्हा बरोबर ? तुम्ही जर हे व्हिज्युलाईझ केलं कि जे तुम्हाला हवं आहे ते मिळालं आहे आणि कृतज्ञता व्यक्त केली कि तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही जितके कृतज्ञ राहाल तेवढं तुम्हाला अधिक मिळत जात. आणि जेवढ्या सध्याच्या परिस्थिबद्दल तक्रारी कराल तेवढ्या तक्रारीचा वाढत जातील कारण " " लाईक अट्रॅक्ट्स लाईक !"

योग्य संधी तुमच्या समोर येईल ह्यावर विश्वास ठेवा आणि  स्वतःची तयारी करून ठेवा संधीच सोन करण्यासाठी !

आणि सातत्याने त्याच गोष्टीचा विचार करू नका. कारण सतत त्याच एकाच विचाराचा पाठलाग करून तुम्ही अडथळे निर्माण करत असता. पेशन्स ठेवा. म्हणजे असं कि तुम्ही सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना तुम्ही तुमच्या इच्छा साठी व्हिज्युलायझेशन केलं,कृतज्ञता व्यक्त केली आणि त्या नंतर तुमचा दिवस नॉर्मल असू देत,त्या इच्छा चा दिवसभर विचार करू नका. युनिव्हर्सल पॉवर वर सोडून द्या. हि खूप महत्वाची गोष्ट आहे. आकर्षणाचा सिद्धांत वापरताना खूपदा  लोक इथे चुकतात. आणि नेहमी तुम्ही जेव्हा एखादा गोल सेट करता तेव्हा तो गोल लोकांच्या आयुष्यात काय व्हॅल्यू ऍडिशन करणारा आहे ह्याचा विचार कायम करा,कारण जेव्हा तुम्ही इतरांसाठी भरभरून करता तेव्हा तुम्हाला भरभरून निसर्ग देतो.

मेडिटेशन रोज करा त्यामुळे तुमचा स्वतःशी संवाद वाढेल आणि  परमेश्वराशी हि संवाद वाढेल कारण आपला आत्मा हा परमेश्वरी अंश असतो,आपण त्याचाच एक भाग आहोत.

श्रीमंत व्हा. सुखी व्हा आणि यशस्वी व्हा !


No comments:

Post a Comment

सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...