Monday, 11 May 2020

बुक रिव्यू -भगवत गीतेतून शिका सफलतेची सूत्र



बुक रिव्यू -भगवत गीतेतून शिका सफलतेची सूत्र

लेखक - डॉ कपिल कक्कड

लेखक डॉ कपिल कक्कड हे  व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ आहेत त्याच सोबत कार्पोरेट प्रशिक्षक ,सल्लागार,प्रेरक लेखक आणि अध्यात्मिक गुरु आहेत. त्यांनी माईंड कोच नावाची भावनांना संचालित करणारी एक प्रक्रिया शोधून काढली आहे आणि आध्यत्मिक आणि शास्त्रीय तंत्राच्या माध्यमातून तणाव व्यवस्थपणावर काही प्रोग्राम तयार केले आहेत.

पेजेस  १६०

हे पुस्तक भगवत गीतेतील तत्वज्ञान आणि उपदेशांवर आधारित आहे. ह्यामध्ये तणाव ,आत्मविश्वासाचा अभाव ,चिंता दूर करून जीवनात सुख ,शांतात,समाधान मिळवून मानवी जीवन सफल करण्याविषयी मार्गदर्शन केलेले आहे.

भगवत गीता हा विवेक, बुद्धी आणि प्रतिभेचा संगम असणारा ग्रंथ आहे.

भगवत गीतेतील १० व्या अध्यात  भगवान श्रीकृष्ण सांगतात कि "प्रत्येक  जिवंत व्यक्तीच्या हृदयात वास करणारा महान आत्मा म्हणजे मीच आहे ,मीच सर्व जीवांचा  आदि ,मध्य आणि अंत आहे. "

परमेश्वर आपल्या सर्वांचं आतच दडलेला आहे त्यामुळे सर्व समाधान होण्यासाठी आपण आपल्याआतच डोकावायला हवं.

जो पर्यंत तुम्ही परमेश्वर आणि त्याचे नियम समजून घेत नाही तोवर तुम्ही जीवनात यशस्वी हो ,आनंदी होणं शक्य होत नाही. तुम्ही स्वतः आपल्या कर्माने आपले भाग्य निर्माण करत असता. आणि परमेश्वर किव्हा निसर्ग,महाशक्ती तुम्ही जे काही नाव द्याल ते ,ती शक्ती तुम्हाला कर्मा प्रमाणे फळ देत असते. त्यामुळे जीवनात परिपूर्ण सफलता मिळवायची असेल तर निसर्ग नियमनाचे महत्व आणि उपयोगिता समजून घेणे गरजेचे आहे.

भगवान श्रीकृष्णाने भगवतगीतेत  स्पष्ट स्वरूपात सांगितले आहे कि तुम्हाला जर जीवनात सफलता हवी असेल तर तुम्हाला सर्वाना निसर्गाने बनवलेल्या नियमानुसार चालावे लागेल.

कर्मासोबत आसक्ती ठेवू नका. कर्म आपल्या सोबत आहे पण फळ आपल्या हातात नाही. हेच आपण सक्सेस लॉ

मध्ये शिकतो ,कर्मसोबत आसक्ती नाही म्हणजेच लॉ ऑफ डिटॅचमेंट. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात त्याचे विचार आणि कर्म हेच त्याच्या जीवनाचा आधार असतात.

आपली समज आणि चारित्र्य हेच बाह्य जीवनात आपले वागणे आणि आचरण सादर करत असतात. आणि अशा प्रकारे वर्तमान जीवन हे भूतकाळात केलेल्या कर्माची फळ असतात

तुमचं कर्म हे तुमची सफलता,असफलता ,आनंद,दुःख ह्या  सर्वांसाठी साठी जबाबदारअसतं आणि तुमच्या ऊर्जेचा स्त्रोत  हि तुमचं कर्म असत म्हणजेच तुमच्या कडे असणारी सकारात्मक ऊर्जा हे तुमच्या सकरात्मक ,चांगल्या कर्माचे प्रतीक असत आणि नकारात्मक ऊर्जा हि नकारात्मक कार्याचे प्रतीक असत. सकारात्मक दृष्ट्या विचार करत असणारी व्यक्ती नेहमी हाच विचार करत असते ती जे काम करत आहे त्याने समाजाचे ,देशाचे कल्याण होत आहे. आणि तुम्ही जेव्हा असाच विचार करता तेव्हाच तुम्ही यशस्वी बनता अश्या व्यक्तींचा निसर्गाच्या नियमांवर पूर्ण विश्वास असतो. .

ह्या सकरात्मक ऊर्जेच्या प्रवाहात आळस (लेझिनेस ) ,नकारात्मक चिंतन(निगेटिव्ह थॉट्स),हीन भावना(लॅक ऑफ कॉफिडन्स ) ,संकल्पशक्तीचा  अभाव. (गोल सेट नसणं),तणाव (टेन्शन) ह्या सगळ्या गोष्टी अडथळे निर्माण करत असतात. आणि ह्यावर मात करण्यासाठी काही उपाय हि लेखकांनी ह्या पुस्तकात सुचवलेले आहेत. मानवी मेंदू ज्याला आपण मन असं हि म्हणतो हि आपल्याला मिळालेली परमेश्वरीय भेट आहे. मेंदू नियंत्रण म्हणजे मन कसं कंट्रोल करायचं ह्यावर त्यांनी अतिशय सुरेख मार्गदर्शन ह्या पुस्तकामध्यें केलेले आहे. मेडिटेशन ,सकारात्मक विचारांचा सराव  म्हणजेच अफार्मेशन्स ,वर्तमान  काळात जगणे,सात्विक आहार ,नकारात्मक लोकांपासून दूर राहणे ,शिस्त ,विशाल दृष्टीकोन सकारात्मक विचारांवरच कायम फोकस असणे ,आत्म परामर्श म्हणजे तुम्हाला तुमचे चांगले -वाईट गुण  माहिती हवेत. मानसिक चित्रण (विझ्युलायझेशन )हे उपाय सांगितले आहेत. त्याच सोबत परमेश्वरावरचा विश्वास आणि स्वतःवरचा विश्वास हि तेवढाच महत्वाचा आहे.

जीवनात सफलता मिळवण्यासाठी एखादे ध्येय किव्हा उद्देश असणे आवश्यक असते.एखाद्या जीवाचा जन्म आणि अस्तित्व हे सुद्धा निसर्गाने ठरवलेले ध्येयच असते. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करणे खूप गरजेचे असते. तुमच्या जीवनाचा मुख्य उद्देश ओळखा समाधान,सफलता ,प्रसन्नता ,आणि अध्यात्मिकता ह्यातील सर्व किव्हा ह्यातील एक उद्दिष्ट तुमचे असू शकते. सर्वाना भरभरून प्रेम द्या आणि क्षमा करा हे दोन्ही गुण  तुम्हाला परमेश्वराच्या जवळ नेतात. प्रेम म्हणजे फक्त नाते संबन्ध किव्हा स्त्री-पुरुष प्रेम नव्हे तर सर्वाना एकाच पातळीवर समजून भेद भाव करत केलेलं प्रेम ,कारण आपल्या सर्वानाच माहित आहे परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात असतो. स्वतःला ,आजूबाजूच्या लोकांना क्षमा करायला शिका त्यामुळे तुमची नकारात्मक भावनांपासून सुटका होते.

अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि माझी सर्वाना विनंती आहे कि तुम्ही हे पुस्तक जरुर वाचा,ऍमेझॉन वर हे उपलब्ध आहे.

 


Sunday, 10 May 2020

मनी सिक्रेट



युनिव्हर्स मध्ये सगळ्यांसाठी भरभरून आहे,तुम्ही इच्छा व्यक्त करा,त्यासाठी च्या योग्य सकारात्मक विचारांची जोपासना करा,तुम्हाला जे हवं आहे ते मिळेलच. हे वाक्य बहुतेकदा कुणालाही सांगितलं किव्हा वाचनात आलं तर लोकांना खोट  वाटत,असं आहे तर मग जगात मूठ भर लोकच श्रीमंत का आहेत? एवढी गरिबी का आहे ?असा प्रश्न पडतो आणि ते साहजिक आहे.

 खरं तर युनिव्हर्स मध्ये सगळ्याच गोष्टींची समृद्धता आहे. आणि निसर्ग कायम आपल्याला भरभरून देत असतो.

मग वर म्हणाले आहे तशी विषमता दिसते ह्याच कारण त्या त्या व्यक्तीचे वैयक्तिक विचारसरणी ह्याला कारणीभूत असते.

आपल्याकडे लहानपणापासून पैश्याबद्दल खूप चुकीचे समज कळत हॅमर केले गेलेले असतात.जसे कि

पैसे झाडाला लागत नाहीत.

पैसे हा वाईट असतो आणि वाईट मार्गाला लावतो.

श्रीमंत माणसं लबाड असतात.

पैश्याच्या मागे धावायचं नसतं .

पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमावण्यासारखाच असतं .

गरीब आणि मध्यमवर्ग कधीच श्रीमंत होऊ शकत नाही.

बँकेत असणारे पैसे कुणालाही सांगू नयेत. आणि असे अजून बरेच असणार आहेत.

तुमचे जर पैश्याबद्दल चे विचार असे नकारात्मक असतील तर पैसा तुमच्या जवळ कसा येईल ?

थोडंसं शांतपणे आणि तटस्थ पणे  विचार  केलात तर तुम्हाला हे सहज पटण्यासारखं आहे.

पैशाची काळजी सतत करणं ,बिल द्यायची वेळ आली कि चीड चीड करणं ,इतर लोकांच्या प्रगतीचा मत्सर करणं       

ह्या सगळ्या भावनांमधून निसर्गाला तुमच्या कडे पैशाची कमतरता आहे हेच समजत.

कारण तुमच्या सबकॉन्शस माईंड ला तुमच्या भावना कळतात,चूक -बरोबर हे समजत नसल्याने ज्या भावना सात्यत्याने तुमच्या पैश्याबद्दल च्या बाळगता त्याच खऱ्या होतात.

इथे निसर्गाचे दोन नियम काम करतात एक म्हणजे ज्या गोष्टीचा सतत विचार कराल ती गोष्ट तुमच्या साठी वाढते,गरिबीचा विचार केलात,पैसे नाहीत,पैसे नाहीत असा विचार केलातर पैश्यची कमतरता वाढणार आहे. आणि दुसरा नियम आहे मागणी तसा पुरवठा. तुम्ही मागणी गरिबीची करताय ना मग पैसे कसे येतील ?

 

बिलांचा राग-राग करायच्या ऐवजी बिलांवर प्रेम करा. तुम्हाला कोणतंही पोस्ट पेड फॅसिलिटी मिळते कारण ते व ढी तुमची ऐपत असते हे गृहीत असत आणि मग ह्या साठी तुम्ही कधी निसर्गाचे,पैशाचे आभार मानले आहेत का ? कधीही पैसे खर्च करताना आधी पैशाला थँक्यू म्हणा आणि मग समोर पैसे पुढे करा. सायलेंट ब्लेसिंग्स कायम काम करत असतात.

 तुम्ही जेवढी आनंदाने वेळेवर तुमची बिल भरलं तेवढा पैशाच्या ओघ तुमचं कडे वाढेल. पैश्यावर प्रेम करा. पैसे प्रसन्न ठिकाणी ठेवा. खूप लोकांना पाकिटात नोटा घडी घालून ठेवायची सवय असते. तुम्हाला जे असं छोट्याश्या जागेत पाय दुमडून तासनतास बसायला लावेल तर कस वाटेल ,तसाच आहे हे. घरातील पैसे ठेवायचा ड्रॉवर  ,कपाट स्वच्छ,सुगंधी ठेवा कायम.

तुमचा उत्कर्ष  पैशांवर नसून तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. आणि हा विचार मनात खोलवर रुजायची गरज आहे.

श्रीमंत व्हा आणि यशस्वी व्हा !

 


Friday, 8 May 2020

बुक रिव्यू - यु कॅन हील युअर लाईफ



ह्या अप्रतिम पुस्तकाच्या लेखिका आहेत लुईस एल हे . 
तुमचं जगण  तुमच्या हाती ! असं घोष वाक्य ह्या पुस्तकात ते आहे. 

लेखिकेबद्दल थोडस :

लुईस हे ह्या अधिव्यख्याता आणि प्राध्यापक आहेत त्याच सोबत बेस्ट सेलर ठरलेल्या २७ पुस्तकांच्या लेखिका आहेत. जगातील २६ भाषांमध्ये त्यांची पुस्तके भाषांतरित झाली आहेत आणि ३५ देशांमध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी निरामय जीवन जगण्याचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन केलेले आहे. 

त्यांच्या विचारसरणीतील काही मुद्दे त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला दिले आहेत आणि मला वाटत कि तेच खूप महत्वाचे मुद्दे आहेत. 

आपल्या प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार असतो. 
आपला प्रत्येक विचार ,आपले भविष्य घडवत असतो. 
वर्तमानकाळाच्या क्षणाक्षणात  नेहमीच शक्ती  साठवलेली असते. 
प्रत्येकजण स्वतःला दोषी आणि अपराधी समजत असतो. 
माझ्या मध्ये काहीही चांगलं नाही,असाच प्रत्येकाला वाटत. 
तो नुसता विचार आहे आणि विचार बदलता येतो. 
आपल्या शरीरात निर्माण होणारे सर्व रोग आपणच निर्माण करत असतो. 
चीड ,टीका आणि अपराधी पानाची भावना हि विचारांची साखळी फार धोकादायक आहे. 
मनातील चीड घालवली तर कॅन्सर सुद्धा बरा होतो. 
आपण भूतकाळ विसरायला हवा आणि सर्वाना माफ करायला हवं. 
आपण स्वतःवर प्रेम करायला  शिकायला हवं. 
स्वतःला आवडून घेणं आणि स्वतःला स्वीकारणं हीच सकरात्मक बदल घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे. 
आपण स्वतःवर खरोखरच प्रेम करायला लागलो ,तर आयुष्यतील प्रेत्येक गोष्ट चांगली व्हायला लागते. 

तुम्ही निवडलेल्या प्रत्येक विचारला ,विश्वासाला जगाकडून कायम च समर्थन मिळत असत त्यामुळे विचार कोणते करायचे हा वैयत्तिक प्रश्न आहे आणि त्या प्रमाणे तुमचं आयुष्य असणार आहे हे मात्र नक्की आहे. तुमच्या समस्या आणि तुमचे अनुभव हे तुमच्या विचारांचे  बाह्य  असतात . 
भूतकाळाबद्दलचा दृष्टिकोन बदलणं हे खूप लोकांना कठीण वाटत आणि त्यांची मानसिक तयारी हि नसते पण जो पर्यंत तुम्ही ते ओझं फेकून देत नाही तोवर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आणि भूतकाळ विसरण्यासाठी तुम्हीं क्षमा करायला शिकायला हवं,तुमचा जर इगो मध्ये येत असेल तर तुम्ही कधीच कुणालाच क्षमा करू शकणार नाही  आहात आणि आनंदी जीवनाला मुकणार आहात. 

"माझ्या अपेक्षेप्रमाणे तू वागला नाही आहेस पण तरीही मी तुला क्षमा करत आहे ,तुला मुक्त करत आहे ",हि सकारात्मकता तुम्हाला मुक्त करते. 

स्वतःवर प्रेम करण ,स्वतःवर कधीही टीका ना करणं ,स्वतःशी प्रेमळ पणे वागणं ह्यामुळे तुम्ही तुमच्यात  खूप मोठा सकारात्मक बदल घडवायला  मदत करत असता. 
आपल्या परिस्थितीला दुसऱ्यांना दोष देणं,आई-वडिलांना दोष देणं हे चुकीचं आहे. आई-वडिलांनी आपल्याला त्यांच्या समजुतीनुसार वागवलेलं असत,त्यांना जशी त्यांच्या आई-वडिलांनी वागवलेलं असत,अनुभव आलेले असतात त्या बेस वर ते आपल्याला वाढवतात. आणि मग तो बेस च जर चुकीचा सेल तर त्यांना दोषी मानणं कितपत योग्य आहे. 

कोणतीही अडचण आल्यानंतर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचार कि "कोणत्या विचारामुळे हि अडचण मी निर्माण केली?" कोणता चुकीचा विचार मी स्वीकारला आणि त्यामुळे हि अडचण अली आहे,ऍनालिसिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तो विचार आणि मग तुम्हाला त्यावरच सोल्युशन हि मिळेल हे नक्की. 

लेखिकेचं ह्या मताशी मी वैयक्तिक हि खूप सहमत आहे कि "तुमचे विचार  तुमचं आयुष्य कस घडवतात,कसे काम करतात " हा विषय शाळेपासूनच शिकवायला हवा. मनाचं कार्य कस चालत ?पैशाचे  व्यवहार,उत्तम पालक कस व्हायचं,नातेसंबंध कसे टिकवायचे हे असे विषय लहान पानापासून हवेत शाळांमध्ये. आजकाल नाते संबंध कसे टिकवायचे ह्याची नीटशी माहिती नसल्यामुळे आणि मन ,मनाचे कार्य ,विचार ह्यांचा आपल्या रोजच्या जीवनात खूप जवळचा संबंध असतो ह्यावर विश्वासच नसल्याने लग्नाळू मुलांच्या किती समस्या निर्माण झाल्या आहेत. 

सहजासहजी लोक बदल स्वीकारायला तयार नसतात. बदल कर म्हंटल कि अनेक कारण पुढे करतात ज्यातून त्यांना हे सुचवायचं असत कि त्यांची कारण अत्यंत व्हॅलिड आहेत आणि नाही होऊ शकत बदल आणि मग हळू हळू त्यांना राग येऊ लागतो. पण ह्या मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी ते विसरतात कि "बदल" हा निसर्गाचा नियम तुम्ही त्याला अपवाद नाही असू शकत आणि तुम्ही  जे  देता तेच परत मिळत ह्या नियमाने तुम्ही जेवढे रंगवलं तेवढी राग निर्माण करण्याची कारण वाढवाल .

पण तुम्हाला जर बदलायला हवं ह्याची जाणीव होत असेल तर मात्र ती चांगली गोष्ट आहे,सकारात्मक बदल तुमच्यात घडतो आहे !
कोणती हि सवय हि गरजेतून निर्माण होते. ज्या सवाई तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्याच तुमची सवय बनलेल्या असतात. हे सगळं जाळं तुम्हीच तुमच्या भोवती विणलेलं असत ,जेव्हा तुम्ही आत्मनिंदा थांबवून स्वतःशी प्रेमाने वागायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला हळू-हळू ह्यातून बाहेर पडायचा मार्ग खुला होतो. 

जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदल्याची असेल तर एक सुंदर वाक्य लेखिकेने सांगितले आहे." ज्या मुळे  माझ्या आयुष्यात प्रश्न निर्माण होतात ती परिस्थितीच मला  बदलवायची आहे."तुमच्या मनात नकारात्मक विचार जेव्हा सातत्याने यायला सुरुवात होतील तेव्हा  हे वाक्य रिपीट करा असं लेखिकेचं सांगणं आहे. 
विचार बदलण्यासाठी चे काही प्रयोग हि लेखिकेने ह्या पुस्तकात दिलेले आहेत. खूप वेळा आपण ऐकतो कि मनावर ताबा ठेवणं शक्य नसत ,पण तस नाही आहे ,मनावर ताबा ठेवता येऊ शकतो. मनापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात आणि मन हे एक साधन आहे आणि तुम्ही ते तुमच्या मर्जी नुसार वापरू शकता. मनाची तुमच्या वर अधिकार गाजवायची सवय तुम्ही नक्कीच मोडू शकता. 

 मनावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही भूतकाळ विसरणं,क्षमाशीलता,काही सवयी ,घटनां पासून मुक्ती,चीड घालवणे,सूड घ्यावा वाटतो त्या व्यक्तींना क्षमा करणे. ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्यात तर तुमचं मन हे तुमच्या ताब्यात येईल. नकरात्मक विचारांशी लढण्यासाठी सकारात्मक विचारांचा कसा वापर करायचा हे त्यांनी उदाहरणासहित ह्या पुस्तकात दिल आहे.
 आर्थिक परिस्थिती ,नोकरी ,तुमचं शरीर ,शारीरिक समस्या  ह्या साठी  त्यांनी सकारात्मक  विचार  (अफार्मेशन्स) खूप छान पद्धतीने मांडले आहेत. काही शारीरिक रोग आणि तो रोग का आहे ह्या मागचा नकारात्मक विचार आणि त्या नकारात्मक विचाराला बदलवणारा सकारात्मक विचार ह्या वरती त्यांनी एक मोठं प्रकरण लिहिलं आहे. 
विचारांना दिशा देऊन आयुष्य बदलायला कशी मदत होते ह्यासाठी च हे उत्तम पुस्तक आहे. 

Sunday, 3 May 2020

मनाची स्वच्छता !

आपण आपल्या घराची रेग्युलर सफाई करत असतो,जाळी -जळमट काढत असतो,घर आवरताना  काही नको असणाऱ्या गोष्टी सापडतात त्या टाकून देतो ,काही गोष्टी  असतात पण आता त्या उपयोगी नसतात म्हणून आपण टाकून देतो. पण मग तसंच कधी तुमच्या मनाची स्वच्छता करता का आहि ना ?

लहान्पपासुंन चे बाळगलेले चुकीचे समज ,काही वेदना देणाऱ्या आठवणी,नको असणारे विचार किती काय-काय भरून ठेवलेलं असत आपणआपल्या मनामध्ये !

आयुष्य खर तर खूप साधं असतं ,पण आपणच आपल्या विचारांनी ते कॉम्प्लिकेटेड बनवत जातो. आणि युनिव्हर्सचा नियम आहे "जे आपण देतो तेच आपल्याला  परत  मिळत असत,प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही घडत असत त्याला  जबाबदार असते पण स्वतः सोडून दुसऱ्यांना दोष  जातो. ईश्वर किव्हा वैश्विक ताकद तुम्हाला कधीच दोष देत नाही ती तुम्हाला तुमच्या विचारानुसार स्वीकारते आणि तशी फळ देते



तुम्ही जर असा विचार केलात कि ह्या जगात मी एकटा आहे ,माझं कुणीही नाही,माझ्यावर कुणीही प्रेम करत नाही तर तुम्हाला तसाच सगळं जग दिसणार आहे आणि तसेच अनुभव हि येणार आहेत. पण ह्या  जग खूप सुंदर आहे.माझ्या आयुष्यात असणारी सर्व  माणसं माझ्या वर भरभरून प्रेम करतात तर तुम्ही तो अनुभव घेणार आहात.  आता पर्यंतचं तुमचं आयुष्यत जे घडून गेलं आहे ते तुमच्या विचारांमुळे आणि  समजुतींमुळे आहे आणि तुम्ही आज तुमचा भविष्यकाळ घडवत आहात तो हि तुमचं आजच्या विचारांमुळे घडत आहे. त्यामुळे जरा निरीक्षण करा तुमचे विचार काय आहेत कसे आहेत ? नकारात्मक आहेत कि सकारात्मक आहेत ?
खूप लोकांना असं वाटत कि ते चांगल्या गोष्टी आयुष्यात डिझर्व करत नाहीत किव्हा त्यांना त्याच्यात काही तरी कमी आहे असा वाटत असत कायम ह्या सगळ्याच कारण त्यांच्या लहानपणात दडलेलं असत. कदाचित त्यांना आई-वडिलांकडून दुर्लक्षित वागणूक मिळालेली असते त्यांनी क्ती हि स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न केला तरी ते आई-वडिलांच्या नजरेत स्वतःला प्रूव्ह करू शकत नाहीत आणि मग त्यांना असं वाटायला लागत कि त्यान्चायत हा काही तरी कमतरता आहे. लहानपणी आई-वडिलांकडून पाठीवर शाबासकी न मिलण हे सुद्धा मोठे पाणी तुमच्या मध्ये कॉन्फिडन्स कमी असण्याचं  करणं असू शकत. 

तुमचे प्रॉब्लेम्स ,तुमचे अनुभव हे तुमच्या आतील विचारांचा बाह्यपरिणाम आहे. कोणत्याही विचारला आधी फारशी ताकद नसते पण जेव्हा तुम्ही तो विचार स्वीकारता आणि त्या विचाराकडे लक्ष्य द्यायला लागता तेव्हा तो विचार भावना बनते आणि आणि भावनांमधून च समजुती बनतात. आणि  चुकीच्या समजुतीना मनातून काढून जण थोडासा कठीण जात पण ती समजूत जेव्हा विचार असतो तेव्हा च जर तुम्ही मॉनिटर केलं तर फक्त सकारात्मक विचार च मनात असतील.  
भूतकाळातील कटू आठवणी विसरण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे क्षमा करणे ! स्वतःला क्षमा करा,इतरांना  क्षमा करा. कारण क्षमा करण्यामुळे ज्या सकारात्मकता निर्माण होते ती तुम्हाला भूतकाळलाच ओझं उतरवून मुक्त करते. 
स्वतः वर प्रेम करायला शिका. स्वतःला  जसे आहात तसे स्वीकारा त्यामुळेच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होणार आहे. 
नातेसंबंध,आरोग्य,अर्थी स्थिती सर्व काही बदलेल जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारलं तेव्हा कारण तुमचा दृष्टिकोन च बदलून जाईल आणि मगाशी आपण पाहिलं कि विचार बदलले कि सगळं जग  बदलत. 

एका कागदावर तुम्ही एका बाजूला तुम्हाला तुमच्या बद्दल वाटणाऱ्या निगेटिव्ह गोष्टी लिहून काढा आणि त्याच कागदावर दुसऱ्या बाजूला ह्या निगेटिव्ह गोष्टी किव्हा ह्या विषयाशी अनुसरून तुम्हाला तुमचे आई-वडील,नातेवाईक ,शिक्षक कोण कोण काय म्हणत होत ते लिहून काढा . उदा. माझी पैसे कमवायची लायकी नाही. आता ह्याच्या समोरचं बाजूला हे तुम्हाला कोण म्हणत होत किव्हा असत आणि काय वाक्य असत जस कि माझे वडील म्हणतात तुला एक हि गोष्ट धड जमत नाही. 

जेव्हा तुम्ही अशी लिस्ट बनवलं आणि तटस्थ पणे  वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि चुकीचे विचार तुम्ही धरून ठेवले म्हणून तुमची स्वतःबद्दल ची हि अशी समजूत बनली आहे. 


आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम आला कि तुम्ही ह्यामागे कोणता विचार आहे,हे शोधून काढलात तर तुम्हाला त्यावर च सोल्युशन लगेच च मिळणार आहे.

वर्तमानातील प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवात करण्यासाठी चांगलाच असतो . बदलाचा निर्णय घ्या. सहसा बदल करायला मन तयार नसत कारण मन हे खूप हट्टी असत. पण जर आताच आयष्य बदलयच असेल तर तुम्हाला बदल करावाच लागणार आहे. 

मनाची स्वच्छता तर आता केली आपण नकारात्मक जुने विचार हि आपण काढून टाकले आहेत आता त्या जागी नवे सकारात्मक विचार रुजवणे तेवढा च महत्वाचे आहे नाहीतर रिकामी जागा परत नकारात्मक विचार बळकावतील. 


सकारात्मक विचार मनात रुजायला नवीन सकरात्मक अफार्मेशन्स लिहून काढा आणि ती रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर वाचायला सुरुवात करा. सकाळची सुरुवात नकारात्मक विचार   जसे कि आजची मिटिंग नीट होईल ना, इ.काळजी ने करायच्या ऐवजी आजचा दि वस खूप प्रसन्न आहे आणि खूप छान असणार आहे,माझी सर्व काम मी यशस्वी पणे पूर्ण करणार आहे . 

परमेश्वराला ,तुमच्या आजूबाजूच्या माणसांविषयी (अगदी बॉस किव्हा आपल्या जोडीदाराविषयी सुद्धा )तुम्ही वापरात असणाऱ्या वस्तू जसे कि मोबाईल,लॅपटॉप,कार इ.अनेक वस्तू सगळ्यनविषयी कृतज्ञता व्यक्त करा.आणि दिवसाची सुरुवात करा. मला खात्री आहे तुमचा दिवस अमेझिंग असेल,आणि मला कमेंट्स करून सांगा तुमचा अनुभव !

Sunday, 25 August 2019

आत्मविश्वास आणि श्रीमंती


पैश्याचा आणि आत्मविश्वासाचा खूप जवळचा संबंध आहे.जेव्हा तुमचा स्वतःवर आणि तुम्ही करत असलेल्या कामावर विश्वास असतो तेव्हा तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. स्वतः वरचा विश्वास डळमळीत न होऊ देण्यासाठी तुम्ही स्वतःला कायम प्रोस्ताहित ठेवल पाहिजे.त्यासाठी सकारात्मक विचार, सकारात्मक वाचन, सकरात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहणे ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाचा रोल निभावतात.
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी सुरु केली तर तुमचा दिवस छान जाईल आणि तुमचा आत्मविश्वास ही कायम राहील.आत्मविश्वास तुम्हाला तुमच ध्येयासाठी प्रेरित करत राहील आणि तुम्ही यशाच्या ,श्रीमंती च्या पायऱ्या चढत जाल.

नकारात्मक विचारांवर विजय कसा मिळवायचा...


नकारात्मक विचार ही बहुतेकदा मनाची सवय बनलेली असते.जेव्हा नकारात्मक विचार आपल्या मनात येतात तेव्हा ते तसेच रेंगाळतात जो पर्यंत तुम्ही ते जाणीवपूर्वक काढून टाकत नाहीत.निगेटिव्ह विचार हे सहसा प्रलोभनासारखे असतात,प्रलोभानाची जशी आपलयाला भुरळ पडते तसच निगेटिव्ह विचारांची हि सवय असलेल्या माणसाला भुरळ पडते.त्यामुळे ह्या निगेटिव्ह विचारांच्या मायाजालातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी करणे फार आवश्यक आहे.
तुमची देहबोली बदला,त्यातून कॉन्फिडन्स दिसूदे ,तुमच मन बोलून मोकळ करा, थोडा वेळ मनात कोणते हि विचार न येऊ देता शांतपणे बसा.विचारांची दिशा जाणीवपूर्वक बदला कारण बऱ्याचदा चुकीचा दृष्टीकोन हा निगेटिव्ह विचारांचा पाया असतो.
फिरायला जा आणि तुम्हाला  ज्या ज्या गोष्टींचे आभार मानावेसे वाटतात त्या त्या गोष्टींचे आभार माना.
ह्या छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करून तुम्ही तुमच  नकारात्मक विचारांनी भरलेलं मन रिकाम करा आणि सकरात्मक विचारांनी ते भरून जाऊ द्या आणि श्रीमंतीच्या वाटे वर चालायला सुरुवात करा.


Tuesday, 27 March 2018

पैसा काय आहे?


आपण सगळे जण ह्या भौतिक जगात राहतो जिथे आपल्याला सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत प्रत्येक गोष्टी साठी पैसे लागतात.पैसा हि एक प्रकारची उर्जा आहे आणि एक प्रकारची ताकद आहे.तुम्हाला कदाचित माहित नसेल पण पैसा हा काही वैश्विक नियम पाळतो. बहुतेकदा अनेकांच्या मनात पैश्याबद्द्ल काही न काही नकारात्मक भावना असते आणि त्यामुळे ते पैसा मिळवण्यासाठी नेहमी फक्त धडपड करत राहतात आणि पैसा त्यांच्या पासून लांब च राहतो.

पैसा हे एक खर तर माध्यम आहे. तुमच जे काही आयुष्य ज्या पद्धतीच आहे पैसा फक्त ते वाढवण्याच काम करतो. तुमच्या कडे पैसा असेल तर तुम्ही आनंदी असता आणि राहता ही. पैसा आपल्या सर्व गरजा सर्व इच्छा पूर्ण करतो त्यामुळे त्याला आपण आपल्या सगळ्यात जवळचा मानला पाहिजे.  

तुमचा जवळचा मित्र असे जेव्हा तुम्ही मानाल तेव्हा तुमच्या मनात पैश्याबद्द्ल नेहमी चांगली भावना ,सकरात्मक भावना असेल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत आणि सुखी होऊ शकणार आहात.

सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत, 
पैसा हा पैश्या कडेच खेचला जातो
नोकरी करून श्रीमंत होता येत नाही
समाधानी राहा.
काटकसरी राहा
अंथरून पाहून पाय पसारा 
हे आणि असे अनेक विचार आपल्या सर्वांच्या मनात लहानपणापासूनवर्षानु वर्षे रुजवले गेलेले असतात अगदी कळत-न कळत आणि हे सगळे पैश्या बद्दलचे निगेटिव्ह विचार आहेत आणि त्यमुळे आपल्या प्रगती मध्ये अडथळे येत असतात आणि आपण मात्र नशीब खराब आहे इ. काही पुन्हा एकदा आपण मनात ग्रह करून घेतो पण ह्या सगळ्यावर चांगला उपाय आहे आपण जर आपला पैश्या बद्दल चा दृष्टीकोन बदलला तर आपल्याला संधी प्राप्त होतील,प्रगती मधले अडथळे दूर होतील आणि आपण मनासारखे पैसे कमवून सुखी होऊ शकतो.

सोशल मीडिया आणि बिझनेस प्रोमोशनआणि मानसिकता !

बरेच दिवस काही ना काही कारणामुळे ह्या मंचावर यायला जमलं नव्हतं. खूप दिवसात काही लिखाण हि केलं नव्हतं, म्हणून आज ठरवलं कि वेळ काढून एक तरी आर...